BJP sakal
मराठवाडा

Apmc Election Result : जिंतूर बाजार समितीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत!

महाविकास आघाडीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाने ग्रामपंचायत मतदारसंघांतील चारही जागा पटकावल्या

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम राखत १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवून संस्थेता स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

शनिवारी सकाळी आठ वाजता औंढा मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण येथे मत मोजणी प्रक्रियेस प्रारंभ होऊन साडेतीन तासात सर्व निकाल जाहीर करण्यात आले.यावेळी दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसह त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्राच्या परीसरात मोठ्या संख्येने जमा झाले होते. जसजसे मतमोजणीचे निकाल जाहीर होऊ लागले त्यावरून भाजपच्या बोर्डीकर गटाच्या बहुमताचे चित्र स्पष्ट होत गेले.

निकालाअंती सहकारी संस्था मतदारसंघांतील अकरा व हमाल मापाडी मतदारसंघांतील एकमेव जागा आणि व्यापारी मतदारसंघांतील दोन्ही जागा याप्रमाणे एकूण चौदा संचालकांच्या जागां बोर्डीकर गटाच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले.तर महाविकास आघाडीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाने ग्रामपंचायत मतदारसंघांतील चारही जागा पटकावल्या आहेत. निकालानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या गटाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

विजयाचा उन्माद न बाळगता जनतेच्या स्वप्नातील जिंतूर घडवण्यासाठी आमचे विजयी उमेदवार प्रयत्न करतील आणि ही सत्ता सामान्य जनतेसाठी वापरतील असा विश्वास

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. सुनील बुधवंत यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT