मराठवाडा

पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

नांदेड : दाखल केलेले गुन्हे मागे घे म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन सप्टेंबर रोजी चैतन्यनगर ते आसना रस्त्यावर घडली.

कंधार तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेला व सध्या भावसार चौक परिसरात राहणारा तलाठी मारोती व्यंकट कदम याचा आणि पत्नीचा मागील काही दिवसांपासून घरगुती वाद होता. यातून पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी तो तिला तगादा लावत असे. दरम्यानच्या काळात दोघेही एकमेकांपासून दूर राहत होते. दोन ऑक्टोबरच्या सायंकाळी पाचच्या सुमारास कदम याने आपली पत्नी विद्या हिला चैतन्यनगर भागात गाठले. ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या अंगावर घरगुती वापराचे निळे रॉकेल टाकले. तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता ती ओरडली व अनर्थ टळला. 

तेंव्हा विमानतळ ठाण्यात एमएलसीवरून नोंद करण्यात आली होती. तब्बल जवळपास दोन महिन्यांनी पिडीत महिलेने विमानतळ ठाणे गाठून तलाठी पती मारोती कदम याच्याविरूध्द तक्रार दिली. यावरून पोलिसांनी त्याच्याविरूध्द ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे हे करीत आहेत. आरोपी तलाठी पसरा असल्याचे मद्दे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT