attempted interception of Pankaja Munde convoy Police lathicharge to disperse protest Aggressive Maratha protestors
attempted interception of Pankaja Munde convoy Police lathicharge to disperse protest Aggressive Maratha protestors Sakal
मराठवाडा

पंकजा मुंडे यांच्या ताफ्यातील वाहने रोखण्याचा प्रयत्न; आंदोलनाला पांगविण्यासाठी पोलीसांचा लाठीचार्ज; मराठा आंदोलक आक्रमक

रामदास साबळे

केज: औरंगपूर येथील संत तुकोबाराय पावनधाम येथे सुरू असलेल्या बीज उत्स्वानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याच्या काल्याच्या किर्तनाला बुधवार (ता.२७) रोजी दुपारी उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा ताफा दाखल होताच काही तरूणांनी 'एक मराठा, लाख मराठा' च्या घोषणा देत पंकजा मुंडे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने पंकजा मुंडे यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी पोलीसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलीसांनी काही तरूणांना गावातून सकाळीच ताब्यात घेत पोलीस वाहनातून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नेल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले होते.

तालुक्यातील औरंगपूर येथील तुकोबाराय पावनधाम येथील संत तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा बुधवारी असल्याने भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी भेट दिली. या सांगता सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुकोबाराय पावनधाम स्थळी पंकजा मुंडे यांच्या सोबतचा वाहनांचा ताफा दाखल होताच मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देऊन वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जमाव पांगविण्यासाठी मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर गर्दीतून पंकजा मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनांना वाट काढून दिली. मराठा तरूणांच्या घोषणाबाजीने गोंधळ होऊन धावपळ सुरू झाल्याने थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र पंकजा मुंडे यांच्या सोबतच्या ताफ्यातील वाहनांना वाट मोकळी करून दिली. पंकजा मुंडे पावणधाम येथून निघून गेल्याचे समजल्याने तणावाचे वातावरण निवळले. कार्यक्रम स्थळी पंकजा मुंडे येणार असल्याने पोलीसांनी सकाळीच परिसरातील जवळबन, लाडेगाव व पळसखेडा येथील श्रीकांत भाकरे,

अविनाश करपे, कृष्णा करपे, प्रशांत करपे यासह इतर मराठा तरूणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे मराठा तरूणांना पोलीसांनी पकडून नेल्याचे समजल्याने सकाळपासून मराठा समाजात तणावाचे होते. या पुर्वीही नारायण गडावरून दर्शन करून गेवराईकडे जाताना साक्षाळपिंप्री या गावात पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. तर बुधवारी औरंगपूर येथे घोषणाबाजी करत अडविण्याचा प्रयत्न झाल्याने पंकजा मुंडे यांना दोनवेळा मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

दर्शनासाठी येण्याला नाही, मात्र स्टेजवरील सत्काराला होता विरोध-

संत तुकोबाराय पावनधाम येथील धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठी पंकजा मुंडे यांच्या येण्याला विरोध नव्हता. मात्र निवडणूकीची आदर्श आचारसंहिता असल्याने किर्तनस्थळी येऊन व्यासपीठावर उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारण्यास विरोध होता. त्यामुळे पोलीसांनी सकाळीच कडक बंदोबस्त तैनात करून काही मराठा तरूणांना ताब्यात घेतले होते.

त्यामुळे मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला होता. परंतू लाठीचार्ज झाल्यानंतर व पंकजा मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनांना वाट काढून देऊन रवाना झाल्यानंतर सकाळी ताब्यात घेतलेल्या तरूणांना दुपारी नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.

लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

औरंगपूर येथील श्रीक्षेत्र तुकोबाराय पावनधाम येथे पोलीसांनी केलेल्या लाठीचार्ज च्या घटनेत वीस-पंचेवीस जण जखमी झाले आहेत. त्यातील चार -पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरिक्षक मच्छिंद्र शेंडगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Lok Sabha Election: बीड लोकसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; कोण जाणार दिल्लीत?

Rohit Sharma : माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ; KKR ने डिलीट केलेला Video पुन्हा झाला Viral

Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Sarfarosh : आमिरची आपुलकी आणि सोनालीची गळाभेट; 25 वर्षांनंतर 'सरफरोश'च्या टीमला भेटून सुकन्या भारावल्या

Melissa McAtee: माझ्या जीवाचे काही बरं वाईट झालं तर ... फायझरच्या व्हिसलब्लोअरने व्हिडिओ शेअर करत केलं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT