औंढा-जिंतूर रस्ता खुल्ला sakal
मराठवाडा

अखेर २४ तासाने औंढा-जिंतूर रस्ता खुल्ला; वाहतूक झाली सुरळीत

पूर्णा नदीच्या पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे २४ तासानंतर वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती औंढा तहसीलदार डाँ कृष्णा कानगुले यांनी दिली

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील माथा गावाजवळील पूर्णा नदीपात्रामध्ये सिद्धेश्वर धरणाचे बारा दरवाजे उघडल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्याचे पाणी माथा गावाजवळ असलेल्या पुलावरून जात असल्याने औंढा जिंतूर रस्ता बंद होता. गुरुवारी ता.३० दुपारी एक वाजता पूर्णा नदीच्या पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे २४ तासानंतर वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती औंढा तहसीलदार डाँ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.

वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहतूकदारांनी आनंदाने आपला प्रवास परत सुरु केला मात्र रात्रीला नदीच्या दोन्हीही काठावर रोडवर वाहनाच्या दोन्ही साईड ने वाहने असल्यामुळे त्या वाहनातील प्रवाशी ,वाहक चालक यांना खिचडी ची व्यवस्था माथा गावातील लोकांनी केली तर नदीच्या पलीकडल्या लोकांना शिवसेना कार्यकर्ता पाडुरंग नागरे व लांडाळा येथील सरपंच शाम इघारे व ईतर ग्रामस्थांकडुन भोजनाची व्यवस्था केली होती. रात्रभर पुलाच्या दोन्ही साईडला पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील जमादार संदीप टाक आदी तळ ठोकून रात्रभर त्या ठिकाणी हजर होते .सध्या औंढा जिंतूर औरंगाबाद रस्ता खुल्या झाल्यामुळे त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT