मराठवाडा

कर्करोगाचे उपचार आले आवाक्‍यात

योगेश पायघन

औरंगाबाद - येथील राज्य कर्करोग संस्थेमुळे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्‍यात आले आहेत. मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातून येथे आलेल्या कर्करोगग्रस्त सुमारे दीड लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी शहरात सुरू झालेले कर्करोग रुग्णालय आज राज्य कर्करोग संस्था म्हणून नावारूपाला आले आहे. नेत्रदीपक कामगिरीने या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कर्करोगाचे महागडे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्याचे काम करीत हे रुग्णालय गोरगरिबांचा आधार बनले आहे.

राज्यातील पहिले व मराठवाड्यातील एकमेव शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला गुरुवारी (ता. २१) पाच वर्षे पूर्ण झाली. २००७ मध्ये मराठवाडा विकास कार्यक्रमाअंतर्गत कर्करोग रुग्णालयाला पन्नास कोटींचा निधी मिळाला होता. ३४ कोटी ४३ लाख ५१ हजार रुपयांची इमारत आणि २८ कोटी ५३ लाख ३१ हजार ७०८ रुपयांची यंत्रसामग्री पहिल्या टप्प्यात मिळाली. पाच वर्षांपूर्वी २१ सप्टेंबर २०१२ मध्ये शंभर खाटा, दहा अतिदक्षता, आठ अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण विभाग; तसेच किरणोपचार विभागामध्ये अत्याधुनिक लिनिअर ॲक्‍सिलेटर, सिटी सिम्युलेटर व ब्रेकी थेरपी ही महागडी उपचारपद्धती मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेत रुजू झाली. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात येतात. सध्या येथे प्रामुख्याने शस्त्रक्रिया, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, ऑर्थोपेडिक आणि नेत्र असे पाच विभाग असून, अत्याधुनिक रेडिओथेरेपी, केमोथेरेपीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

‘टाटा’शी संलग्नीकरण
‘घाटी’च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे पाठबळ आणि कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलशी संलग्नीकरण झाल्यामुळे तेथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळत आहे. अधिष्ठाता आणि सीईओ यांच्या प्रयत्नांमुळे विस्तारीकरणाने वेग घेतला आहे. येत्या दोन वर्षांत शंभर खाटांमध्ये नव्याने दीडशेची भर पडणार आहे.

राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी शहरात झालेल्या १५ ऑक्‍टोबर २०१६ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला होता. केंद्र शासनाच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी आणि स्ट्रोक (एन.पी.सी.डी.सी.एस.) या कार्यक्रमाअंतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत १२० कोटी रुपयांत विस्तारीकरणात दीडशे खाटांची व्यवस्था असलेली इमारत उभी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ कोटींचा निधी मिळाला असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

विस्तारीकरणाची प्रतीक्षा
भाभाट्रॉन आणि लिनॅक या उपचारपद्धतीचे दोन बॅंकर उभारण्यात येणार आहेत. किरणोपचार विभागात लिनिअर ॲक्‍सिलेटर (लि-नॅक), ब्रेकी थेरपी, डिजिटल मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओलॉजी, एमआरटी, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, मायक्रो केमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजी, मेडिकल अंकालॉजीला, सर्जिकल अंकालॉजीचे अद्ययावतीकरण येत्या दोन वर्षांत करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत ही राज्य कर्करोग संस्था जवळपास तीनशे खाटांसह अत्याधुनिक उपचारांसाठी सज्ज होणार आहे.

२०१२ ते २०१७ ची कामगिरी 
विभाग        उपचार करण्यात आलेले रुग्ण

बाह्यरुग्ण विभाग    १ लाख ४४ हजार ५०५ 
आंतररुग्ण विभाग    १६ हजार १०२
लिनिअर ॲक्‍सिलेटर    
(लि-नॅक)     ३ हजार ७८७
कोबाल्ट युनिट    १ हजार ४२२
ब्रेकी थेरपी        १ हजार २२७
डे केअर केमोथेरेपी    २७ हजार ८५३
मोठ्या शस्त्रक्रिया    २ हजार ६०१
छोट्या शस्त्रक्रिया    २ हजार १६७ 

तपासण्या
मायक्रोबायोलॉजी ९ हजार ३०५
पॅथॉलॉजी १ लाख 13 हजार ७८३
बायोकेमिस्ट्री ४ लाख ५८ हजार ३२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT