औरंगाबाद - ‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथराइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे आयोजित ‘सकाळ’ ऑटो एक्‍स्पोचे फीत कापून मनीष धूत यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी श्रीनिवास अगुरू, इमरान खान, मनोज पवार, फेरोज खान, इरफान खान, जुनेद
औरंगाबाद - ‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथराइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे आयोजित ‘सकाळ’ ऑटो एक्‍स्पोचे फीत कापून मनीष धूत यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी श्रीनिवास अगुरू, इमरान खान, मनोज पवार, फेरोज खान, इरफान खान, जुनेद 
मराठवाडा

‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’मध्ये मिळणार ऑन द स्पॉट फायनान्स

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - दिवसागणिक बदलणारे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोचावे, ते पाहता यावे, यासाठी ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ या चारदिवसीय प्रदर्शनास गुरुवारपासून (ता. सात) अदालत रोडवरील कासलीवाल-तापडिया मैदानावर प्रारंभ झाला. धूत मोटर्सचे उद्योगपती मनीष धूत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. 

काळानुसार होणारे बदल लक्षात घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरवासीयांना ऑटो मोटर्समधील विविध प्रकार आणि नावीन्याची माहिती व अनुभूती मिळणार आहे. याशिवाय विविध दुचाकी, चारचाकी व कमर्शियल वाहन खरेदीबरोबरच विविध बक्षिसे आणि ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी शहरवासीयांमध्ये या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहिली जाते. उद्‌घाटन सोहळ्यानंतर श्री. धूत यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन वाहनांची माहिती घेतली. तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, मोहरीर ऑटोचे श्रीनिवास अगुरू, इमरान खान, मनोज पवार, फेरोज खान, जुनेद खान, अभिजित अग्रवाल, अमित पांडव, उमेश गिरधारी, दिग्गीकर, इक्‍बाल खान, जुबेर खतीब, आशिष जोशी, मंदार कुलकर्णी, प्रवीण सूर्यवंशी, लियाकत अलीखान, विजयसिंग राजपूत उपस्थित होते.

‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथरॉइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवारपर्यंत ते सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात वीस दुचाकी व चारचाकी कंपन्या आणि शोरूमचा सहभाग आहे. यामध्ये विविध कंपन्यांतर्फे आकर्षक ऑफर आणि विविध स्कीम्स दिल्या जाणार आहेत. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना रोज लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९६०४५७७२२२, ९८२३११११६६ यावर संपर्क साधावा, तसेच प्रदर्शनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्यकाळातील वाहने ठरताहेत आकर्षण
देश स्वातंत्र्यकाळात प्रसिद्ध असलेल्या बॅन्टम (Bantam) १२५ सीसी असलेली दुचाकी आणि बीएसए ही ३५० सीसीची दुचाकी प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. यासह हारले डेव्हिडसन आणि मर्सिडिज बेन्झ हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहेत.

सहभागी कंपन्या व शोरूम 
या प्रदर्शनात धूत ह्युंदाई, मारुती सुझुकी, सतीश मोटर्स, शरयू टोयोटा, नेक्‍सा सेव्हन हिल्स पगारिया ऑटो, एसकेवायएस ऑटोमोबिल, पगारिया ऑटो सुपर कॅरी, एसबीआय बॅंक लि., रत्नप्रभा होंडा, डिलक्‍स सुझुकी, एचडीएफसी बॅंक, टू-रिव्हर्स हारले डेव्हिडसन-पुणे, मोहरीर ऑटो प्रा.लि., एटीसी ऑटोमोटिव्ह, एसटीसी मोटर्स यांचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT