मराठवाडा

ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सातारा परिसरात नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर निघालेल्या कुटुंबाला भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ घडली. या अपघातात मागे बसलेल्या महिलेचा चिरडल्याने मृत्यू झाला; तर दुचाकीवरील एक युवक व बारा वर्षांची मुलगी जखमी झाली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. राधा अशोक साबरवाल (४०, रा. पदमपुरा) असे मृताचे नाव आहे. 

राधा या गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीने (एमएच- २०, डीएम- ५३०) एक युवक आणि एका बारावर्षीय मुलीसह सातारा परिसरात जात होत्या. त्यांची दुचाकी रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरून उतरत असताना अजिंठा वाशिंग सेंटरसमोर पाठीमागून भरधाव येणाऱ्या फरशीने भरलेल्या ट्रकने (जीजे- ३६, टी- ५२५५) त्यांना धडक दिली. यात युवक आणि मुलगी जखमी झाली; तर राधा या ठार झाल्या. परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक जप्त करून चालक सिंकदर आदमभाई यास ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT