मराठवाडा

जुन्या शहराचा पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जुन्या शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळित झाला असून, शुक्रवारी (ता. 17) रात्री जायकवाडी धरणावरील महापालिकेच्या पंपगृहात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सातशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे जुन्या शहराला निर्जळीचा सामना करावा लागला. 

शहराला सातशे व 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सातशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे मुख्यतः जुन्या शहरात पाणीपुरवठा होतो. दरम्यान, सातशे मिलिमीटर जलवाहिनीच्या पंपगृहात शुक्रवारी रात्री मुख्य पॅनलमध्ये स्पार्किंग झाले. त्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वायर जळाल्या. तसेच उपकेंद्रातील पॅनेल बोर्ड नादुरुस्त झाले. त्यानंतर पाणी उपशाचे पंप रात्री दहापासूनच बंद पडले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर केवळ बाराशेच्या एकाच जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा झाला. 

दरम्यान, पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले, की दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम पूर्ण होऊन शनिवारी रात्री उशिरा पंपिंग सुरू होऊ शकेल. तांत्रिक बिघाड आणि छावणी परिषदेचा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी घेतलेला खंडणकाळ यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे. तो सुरळीत होण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवधी लागेल. आठ दिवसांत दुसऱ्यांदा जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. 

या भागाला मिळाले नाही पाणी 
जुन्या शहरातील असंख्य भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. भुजबळनगर, पडेगाव, कोतवालपुरा, खडकेश्‍वर, सम्राट कॉलनी, भोईवाडा, हनुमान टेकडी जलकुंभावरील वितरण, पैठणगेट, टिळकपथ, सिल्लेखाना, जुना उस्मानपुरा, रमानगर, नूतन कॉलनी, गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक, नागसेननगर, कबीरनगर, इत्यादींसह शहागंज, दिल्लीगेट आणि जिन्सी जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT