Aurangabad polices JanSetu App for women help
Aurangabad polices JanSetu App for women help 
मराठवाडा

महिलांच्या मदतीसाठी औरंगाबाद पोलिसांचे 'जनसेतू अॅप'

योगेश पायघन

औरंगाबाद : स्वतःला मदतीची गरज असो की पीडित महिला मुलींना किंवा दुसऱ्याला मदत मिळवून द्यायची असेल तर ती एक क्लिकवर मिळू शकणार आहे. त्यासाठी जनसेतू अँड्रॉईड मोबाईल ऍप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केलेल्या उपाययोजना पीडित, अपघातग्रस्ताला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार आहे.

महिला अत्याचार, अपघात, चोरी, लूट, वाहतुकीच्या संदर्भात घटनास्थळी पोलिसांची मदत सर्वात आधी पोहचावी या उद्देशाने पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या मोबाईल ऍपचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी (ता.14) कैलास शिल्प येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर, पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निर्भया पुस्तिका, महिलांसाठी माहिती पत्रक, व आवाहानपत्राचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मदतीसाठी एक पाऊल पुढे 
 

लातूरच्या महेश खंडाळकर यांनी हे ऍप्लिकेशन डेव्हलप केले. पॅनिक कॉल, अपघात मदत एका क्लिकवर पोलिसांना मिळेल. वाहतुकीच्या नियमाची माहिती, दैनंदिन समन्वयाची सुविधा यात देण्यात आली आहे. पोलिसांनी उचलून नेलेल्या वाहनांची, भाडेकरूंची माहिती आदी ऑनलाईन सुविधा या अॅपवरून मिळणार आहे.

तसेच रिक्षा संदर्भातील मदतीची सुविधा आहे. वाहतुकीचे मार्ग बदल, रॅगिंग, रिकामी मालमत्ता, गावी जाण्याची पोलिसांना कल्पना देणे, घर कामगारांचे व्हेरिफिकेशन, धोकादायक रस्ते, लाईव्ह ट्रॅफिकची माहिती, हरवलेल्या व्यक्ती, आरोपीची माहिती पोलिसांना या जनसेतू अॅपच्या माध्यमातून देता येईल. तसेच वृद्ध दाम्पत्यांना मदत व सुरक्षा देण्याची सुविधाही यातून मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT