Paithan
Paithan  sakal
छत्रपती संभाजीनगर

Paithan : रेशन दुकानातून ४ हजार साड्यांचे हाेणार वाटप ; पैठण तालुक्यातील चित्र,तहसील कार्यालय प्रशासनाकडून तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा

पैठण : अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी एक मोफत साडी रेशन दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. या योजनेकरिता राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातील चार हजार ११४ अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साडी स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणार आहे.

पुरवठा विभागात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची सर्वाधिक संख्येची नोंद बिडकीन १२१८ तर पाचोड या गावी १२१८ अशी झाली आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू असून, होळीपर्यंत लाभार्थींना साडी वितरित केली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ साड्यांचे गठ्ठे प्रत्येक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरणव्यवस्थेच्या गोदामात पोचविणार आहे.

योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वितरण केले जाणार आहे. होळीच्या सणापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका एक याप्रमाणे वितरण केले जाणार आहे. साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महामंडळाकडून तालुका स्तरावरील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी शासन निर्णयाच्या पत्राद्वारे पैठण तहसील पुरवठा विभागाला कळविले आहे. दरम्यान, पुरवठा अधिकारी विष्णू घुगे, निरीक्षक सतीश पेंडसे, अव्वल कारकून राजेश शिंदे व प्रदीप निवारे यांनी वाटपाचे नियोजन केले आहे.

दरवर्षी एक साडी

अंत्योदय कार्ड असलेल्या कुटुंबांतील महिलेला दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. साड्यांचे वितरण स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्यासह आता साडीचेही वितरण होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार पैठण तालुक्यातील अंत्योदय कार्डधारक कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजन उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलिमा बाफना, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते पुरवठा विभागाकडून केले जात आहे. लवकरच वितरण होणार आहे.

— विष्णू घुगे, प्रभारी तालुका पुरवठा अधिकारी, पैठण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT