sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : वेगळा विचार करण्याची वेळ आमच्यावर आणू नका

‘वंचित बहुजन’चा महाविकास आघाडीला इशारा

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कमकुवत झाले, तर काँग्रेस पक्षही क्षीण झालेला आहे. या उलट वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असल्याने लोकसभेच्या ४८ जागांची समान वाटणी करून, वंचितला बारा जागा द्याव्यात. तसा प्रस्ताव महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना पाठवण्यात येणार आहे.

जागा वाटपाचा निर्णय दोन आठवड्यांत घ्यावा, आमच्यावर वेगळा निर्णय घेण्याची वेळ आणू नये, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मंगळवारी (ता.२६) पत्रकार परिषदेत दिला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (ता.२६) छत्रपती संभाजीनगरात झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रवक्ते फारुक अहमद आदींची उपस्थिती होती.

तीन उमेदवार मुस्लिम

वंचित बहुजन आघाडीला मिळणाऱ्या १२ जागांमध्ये किमान ३ उमेदवार मुस्लिम दिले जाणार आहेत. उरलेल्या ९ जागांमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी उमेदवार देण्यात येणार आहेत. कुठल्या बारा जागा लढणार हे ठरले नाही, मात्र वंचित समूहाला संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 'आमा'चा जन्म भारतात.. त्यांना महिन्याला पैसे पाठवत होतो; गुहेतील महिलेच्या नवऱ्याचा दावा, कोण आहे ड्रोर गोल्डस्टीन?

Dindori Accident : मोटारसायकलला धडकताच नाल्यात कोसळली कार, बालकासह 7 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Aadhaar Death Registration : मृत्यूनंतरही जिवंत राहतात कोट्यवधी लोक; सुरू झाली 'मृत्यू नोंदणी सेवा', असा निष्क्रिय करा आधार क्रमांक

Dnyaneshwari Munde: परळीच्या बंगल्यावरुन कॉल आला अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप! 18 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले, आरोपी मोकाट

'लग्न करणं गरजेचं आहे का?' प्राजक्ता माळीने विचारला होता गुरुंना प्रश्न

SCROLL FOR NEXT