छत्रपती संभाजीनगर

प्री-प्रायमरीतील पैशांचा रतीब यंदा ‘लॉक’

शेखलाल शेख

औरंगाबाद: शिक्षणाच्या नावाखाली दरवर्षी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर आणि सिनिअर केजीत पालकांकडून बक्कळ पैसा वसूल केला जायचा. काही जणांनी तर छोट्या सेटर, फ्लॅट, छोट्याशा जागेत एका प्रकारे ‘दुकान’ सुरु केल्यासारखे प्ले ग्रुप सुरु केले होते. मात्र, कोरोनामुळे यंदा या लाटेला चांगलाच दणका बसला असून बहुतांश पालकांनी हात वर केल्याने प्री-प्रायमरीतील बक्कळ पैशाला लगाम लागला आहे.

मागील काही वर्षापासून अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील बहुतांश भागात प्री प्रायमरीच्या नावाने शाळांची लाटच आली. ‘प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी’त बक्कळ पैसा मिळवला जात होता प्री-प्रायमरीत मागील काही वर्षात फिस, स्टेशनरीत नोटांचा वर्षावच होत असल्याने गल्लोगल्ली, शहरातील, परिसरातील मिळेल त्या भागात अशा शेकडो शाळा सुरु झाल्या. मात्र यातील बहुतांश शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेतली नाही.

अगोदर निवासी वापरासाठी असलेल्या बहुतांश जागेत या अशा प्री प्रायमरीच्या शाळा सुरू आहेत. काही जण प्लेग्रुप सुरु करण्यासाठी खास नियोजन, खास इमारतीच्या फंदात पडले नाहीत. छोटासा प्लॉट, पाच-सहा दुकाने असलेले ठिकाण, मंगल कार्यालयाची जागा, फ्लॅट, पूर्वी रहिवासी वापरासाठी असलेली घरे, इमारत यामध्ये प्री-प्रायमरी सुरू केली गेली. येथील भिंती रंगवून, थोडीशी खेळणी, आकर्षक सुविधा देण्याच्या नावाखाली ही प्री-प्रायमरी शाळा सुरु झाल्या.

सहा वर्षांच्या आतील मुलांना पुरेसे खेळाचे मैदान, खेळणींची आवश्‍यकता असते. मात्र, अनेक ठिकाणी छोट्याशा प्लॉटवर सुरु झालेल्या या शाळांमध्ये सर्वच मुलांना बसण्यासाठी मुबलक जागाच नसते. शाळांसमोर नावालाच एक-दोन खेळणी ठेवलेली असतात. कोरोनामुळे यंदा हा सर्व प्रकार बंद आहे. 

भाड्याचे पैसे कसे देणार? 

प्ले ग्रुपमधील मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे अवघड असल्याने त्यांच्या पालकांकडून फिससुद्धा मागता आली नाही. त्यामुळे ज्या जागेत भाड्याने प्री प्रायमरी सुरु होती त्याचे भाडे आता कसे भरायचे हा प्रश्‍न प्री प्रायमरी चालविणाऱ्यांसमोर आहे. परिणामी काहीजण तर प्री-प्रायमरी यंदा सुरुच करायची नाही अशा विचारात आहेत. 

पालकांची लूट झाली कमी 

दरवर्षी प्री-प्रायमरीच्या नावाने पालकांनी हजारो रुपये शुल्क भरावे लागत होते. तसेच स्टेशनरी, युनिफॉर्मसह अनेक बाबींसाठी पालकांना खर्च करावा लागत होता. कोरोनामुळे यंदा या सर्व गोष्टी झालेल्या नाहीत. आता शाळा सुरु झाल्यातरी प्री प्रायमरीत पालक मुलांना पाठवतील का? याचीसुद्धा धास्ती प्री-प्रायमरी चालकांनी घेतली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT