gas cylinder explosion
gas cylinder explosion  sakal
छत्रपती संभाजीनगर

आष्टी: गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : तालुक्यातील वाहिरा येथील बापू महंमद शेख (वय ६५) व त्यांचे कुटुंबातील सदस्य सोमवारी (ता.२८) रात्री जेवण करून झोपी गेले असता रात्री अकरा वाजेच्या सुमारास घराच्या छपराच्या आग लागली. आग लागताच घरातील सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेत आपला जीव वाचविला. मात्र या आगीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर उद्‍ध्वस्त झाल्याने घरातील रोख दोन लाख रुपये, आठ शेळ्या, पाच पोते धान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर बापू महंमद शेख व त्यांची मुलगी बालम बापू शेख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील बापू महंमद शेख व त्यांचे कुटुंबीय मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवसभर काबाडकष्ट करून सोमवारी रात्री सर्वजण झोपी गेले होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास घरात लावलेली पेटती चिमणी पडल्याने छपराच्या घराला आग लागली. आग लागताच घरातील सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट झाला. यात घरात ठेवलेले रोख दोन लाख रुपये, पाच पोते धान्य, संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तर आठ शेळ्या ठार झाल्या.

या आगीत बापू शेख व त्यांची मुलगी भाजली असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र खुंटेफळ येथे उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाच्या जवळील रंगनाथ गाडे यांचा जनावरांसाठी गोठा असून त्यामध्ये ठेवलेली शेती अवजारे देखील या आगीत जळाली. तसेच रंगनाथ झांजे यांच्या शेतातील २० गुंठे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT