Aurangabad crime news
Aurangabad crime news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime: दुकान फोडून दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Aurangabad Crime News : दुकान बंद करून कार्यक्रमासाठी भावाकडे गेलेल्या महिलेच्या दुकानातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने व किमती साड्या असा जवळजवळ १८ ते २० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून डीव्हीआरसुद्धा लंपास केला. ही चोरीची घटना मंगळवारी (ता.१४) सकाळी उघडकीस आली.

अरविंद भगवंता यादव (रा.साईसंकेत पार्क गट १०६, रो हाऊस नं ३३, बीड बायपास) यांचे साजापूर गट नंबर ४१ मधील प्लॉट क्रमांक ५२ येथे श्री महालक्ष्मी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. यादव यांच्या मुलीचे ३० मेरोजी लग्न आहे. त्यापूर्वी २७ फेब्रुवारीरोजी साखरपुडा असल्याने लग्नाचा बस्ता खरेदी करून त्यांनी दुकानात ठेवला होता.

विशेष म्हणजे लग्नाच्या बस्त्यासाठी त्यांनी रक्कमही जमा केली होती. मात्र, बस्ता बांधताना वराकडील मंडळींनी पैसे भरले. त्यामुळे त्यांच्याकडील पैसे तसेच होते.

अरविंद यादव यांच्या पत्नी संगीता यांच्या भावाच्या घरी कार्यक्रम असल्याने रोख रक्कम व लग्नाचा बस्ता दुकानात ठेवून संगीता व अरविंद यादव सोमवारी (ता.१३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार्यक्रमासाठी सिडको वाळूज महानगर येथे गेल्या होत्या.

त्यानंतर रात्री उशिर झाल्यामुळे तशाच बीड बायपास येथील राहत्या घरी गेल्या. सकाळी ते दुकानात आले असता ही चोरी झाल्याचे लक्षात आले.

चोरीबाबत यादव यांनी सांगितले, की चोरट्यांनी शिडी लावून घराच्या वरच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर जिन्यातून खाली उतरून आतून कडी उघडून दुकानातील ऐवज लंपास केला.

यात रोख अंदाजे सव्वासहा लाख रुपये, पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या व २२ ग्रॅमचे झुमके तसेच पैठणी साड्या असा जवळजवळ १८ ते २० लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस आणि घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, माग निघू शकला नाही. चोरीची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT