Aurangabad first heavy rain
Aurangabad first heavy rain sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : यंदाचा पहिलाच जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पावसाचा जोर हळूहळू वाढत असून, शुक्रवारी दुपारनंतर शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. वातावरणात गारवा वाढल्याने उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ५१.०२ मिलिमिटर एवढी नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असला तरी अद्याप जोरदार पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे वातावरणातील उकाडा कायम आहे. शुक्रवारी पहाटे शहराच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारनंतर पुन्हा आकाशात काळे ढग दाटून आले. साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस कोसळत होता.

त्यामुळे शहरातील अनेक चौकात पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. जवळ रेनकोट, छत्री नसलेले नागरिक रस्त्यावर जागोजागी आडोसा धरून थांबल्याचे चित्र होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५१.०२ मिलिमिटर एवढ्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे. दरम्यान सायंकाळी चार वाजता गारखेडा परिसरात पोद्दार शाळेसमोर रस्त्यावर झाड कोसळल्याचा प्रकार घडला. नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात झाड रस्‍त्यातून बाजूला केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT