aurangabad smart city
aurangabad smart city  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : स्मार्ट सिटीचे वाचले ९० कोटी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने गेल्या १५ दिवसांत १८ कामांच्या ६३५ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात शहरातील १०८ रस्ते, सफारी पार्कचा दुसरा, तिसरा टप्पा, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या १८ कामांच्या निविदा अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने गेल्याने स्मार्ट सिटीचे तब्बल ९० कोटी रुपये वाचले आहेत.

स्मार्ट सिटी अभियानाला केंद्र शासनाने जून २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी या अभियानात हाती घेण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करून कार्यरंभ आदेश देण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांच्या विक्रमी वेळेत तब्बल ६३५ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. विशेष म्हणजे या सर्वच निविदा अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने गेल्याची माहिती सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

कंत्राटदारांनी कमी दाराच्या निविदा भरल्यामुळे स्मार्ट सिटीचे तब्बल ९० कोटींपेक्षा जास्त पैसे वाचले आहेत. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एक हजार कोटींची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आतापर्यंत अंदाजपत्रकानुसार सुमारे १२०० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत तर प्रत्यक्षात ११०० कोटींत या निविदा गेल्या आहेत. या सर्व निविदेनुसार आणखी १०० कोटी रुपयांचा निधी टाकावा लागणार आहे. पण यातील एखादी निविदा काही कारणांमुळे रद्द झाली तर संपूर्ण कामच रद्द होणार आहे, त्यामुळे कामे व निधीत मोठी तफावत राहणार नाही, असा दावा श्री. पांडेय यांनी केला.

स्मार्ट सिटीतील १८ कामांच्या निविदा अंतिम झाल्यानंतर सध्या कंत्राटदारासोबत अनामत रक्कम जमा करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. वेळेत काम पूर्ण करून घेण्याचे प्रशासनासमोर आवाहन असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT