Aurangabad car crashing into well with driver
Aurangabad car crashing into well with driver sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : देव तारी त्याला कोण मारी...

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : एका विहिरीत थेट कारसह कोसळूनही चालकाला साधे खरचटले सुद्धा नाही. यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय सदर चालकाला आला आहे. ही घटना गुरुवारी फुलंब्रीहुन बाबरा-पाचोरा महामार्गावरील कान्होरी गावाजवळील एका विहिरीत घडली. चालक कारसह विहिरीत पडल्यानंतर तो विद्युत मोटारीच्या पाइपचा आसरा घेऊन बाहेर आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पेंडगाव येथील अनिल डकले हे त्यांच्या कान्हेगाव येथील सासुरवाडीला जात होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास रस्ता खराब असल्याने त्यांनी करा रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगड मध्ये आल्याने त्याला कट करण्याचा प्रयत्न करीत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोन्होरी गावाजवळील कचरू बारवाल यांच्या शेतातील गट नंबर १३२ मधील विहिरीचा कठडा तोडून कार थेट विहिरीत कोसळली.

हे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी श्री डकले यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ कारच्या दरवाजा खोलून बाहेर ते बाहेर पडले. यानंतर विहिरीतील विद्युत मोटारीच्या पाईपचा त्यांनी काही वेळ आसरा घेतला. तोपर्यंत आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना मदत करीत विहिरीतून बाहेर काढले. कार चालक बाहेर आल्यानंतर येथे जमा झालेल्या नागरिकांनी देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा चालकाने प्तत्यक्ष अनुभव घेतल्याची चर्चा ऐकावयास मिळाली.

तेरा वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा

फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर सुमारे तेरा वर्षांपूर्वी बनकिन्होला येथील रोड लगत असलेल्या विहिरीत बस कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत अनेक जण मृत्यू मुखी पडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT