Aurangabad district heavy rain still two days agriculture loss
Aurangabad district heavy rain still two days agriculture loss sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी दमदार बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या भागात याआधीच ठिबकवर कपाशी, मिरची, आद्रक लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. दोन दिवसापासून सतत हजेरी लावणारा पाऊस लागवड झालेल्या पिकांसाठी आशादायक आहे.

शुक्रवारी औरंगाबाद तालुक्यात सरासरी १५.२ मिलिमीटर गंगापूर तालुक्यात सरासरी १४.१ मिलिमीटर, वैजापूर तालुक्यात सरासरी १२.६ मिलिमीटर, कन्नड तालुक्यात २४.२ मिलिमीटर, सिल्लोड ८.९ मिलिमीटर तर सोयगाव तालुक्यात १ मिलिमीटर व फुलंब्री तालुक्यात सरासरी १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी शनिवारीही पाऊस झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT