Aurangabad Ganesh Visarjan 2022
Aurangabad Ganesh Visarjan 2022 
छत्रपती संभाजीनगर

Ganesh Visarjan 2022 : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला देणार निरोप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे आज (ता. नऊ) विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल पथकांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली असून शहरातील विविध भागात मिरवणुकीसाठी देखावे तयार करण्यात आले आहेत.

हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत घरोघरी असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मनपाच्यावतीने संकलन करण्यात आले होते. तसेच गणेश मंडळांना देखील गर्दी न करता, मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीने गुलालाची उधळण करून बाप्पाला निरोप द्यावा लागला होता. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे.

यावर्षी देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी मनपाच्यावतीने मूर्तीचे संकलन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी केंद्रं निश्चित केली आहेत. शुक्रवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन शुभ मुहूर्तावरच करावे. राहू काळात गणपती विसर्जन करू नये.

पूजा विधी

गणपती विसर्जनासाठी लाकडी पाटावर प्रथम पिवळे अथवा लाल कापड अंथरावे. त्याच्यावर स्वस्तिक बनवावे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. मूर्तीची विधिवत पूजा करावी. फुले अर्पण करून मोदक, फळांचा नैवैद्य दाखवावा. बाप्पाची आरती करुन पूजेशी संबंधित वस्तूंचे आदरपूर्वक विसर्जन करावे. यानंतर गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशी मनोभावे प्रार्थना करून निरोप द्यावा.

गणपती विसर्जनासाठी मुहूर्त

  • ६.०५ ते १०.४५ पर्यंत - पहाटेचा मुहूर्त

  • १२.१८ ते १.५२ पर्यंत - दूपारचा मुहूर्त

  • ५.०० ते ६.३१ पर्यंत - सायंकाळी मुहूर्त

  • ९.२६ ते १०.५२ पर्यंत - रात्रीचा मुहूर्त

हे मार्ग बंद राहणार

  • संस्थान गणपती ते बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, जिल्हा परिषद मैदान

  • सिटी चौक ते जुना बाजार मार्गे भडकल गेट.

  • जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफर गेट मोंढा ते राजाबाजार.

  • निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन

  • भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन

  • चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधी पुतळा

  • लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड

  • कामाक्षी लॉज ते सिटी चौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, पैठण गेट

या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.

  • सिटी चौक पोलिस ठाणे पश्चिमेकडी बुर्हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.

  • सिल्लेखाना चौक, पैठण गेट, बाराभाई ताजिया, रंगार गल्ली, सिटीचौक

  • सावरकर चौक, एमपी लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/बळवंत ,वाचनालय चौक

  • अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबूराव काळे चौक

  • रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबूराव काळे चौक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result 2024 : यंदा बारावीच्या निकालात मुलींचा डंका, महाराष्ट्रात एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी

Latest Marathi News Live Update: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९३.३७ टक्के लागला निकाल

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

SCROLL FOR NEXT