Aurangabad high court allows abortion on doctors Report
Aurangabad high court allows abortion on doctors Report sakal
छत्रपती संभाजीनगर

गर्भात व्यंग, गर्भपाताला खंडपीठाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सव्वीस आठवड्याच्या गर्भात व्यंग असल्यामुळे संबंधित महिलेस औरंगाबाद खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. गर्भातील बाळाचा पूर्ण विकास होऊ शकणार नसल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता.

शहरातील एका महिलेस गर्भधारणा झाली होती. या महिलेने ११ जून रोजी तपासणी केली असता गर्भातील बाळ जन्मास आल्यानंतर त्यास अपंगत्व येऊन त्याचा विकास पूर्ण होऊ शकणार नाही, असा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे संबंधित महिलेने अॅड. संदीप राजेभोसले यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन गर्भपात करण्यासाठी परवानगी मिळण्याची विनंती केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील डॉक्टरांचा अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल व अॅड. दिनेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. व्ही. घुगे व न्या. ए. एल. पानसरे यांनी महिलेस गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT