Fraud
Fraud  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : क्राफ्ट पेपर कंपनी मालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : क्राफ्ट पेपरचा कच्चा माल तयार करणाऱ्या कंपनीमालकाची तब्बल ५ लाख २६ हजार ६९२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये घडला. इतकेच नव्हे तर पैसे मिळतच नसल्याने फिर्यादी कंपनीमालकाने तब्बल पाच वर्षे विक्री केलेल्या कच्चा मालाच्या पैशांसाठी संशयित आरोपीकडे तगादा लावला; परंतु एकही रुपया मिळत नसल्याचे पाहून पाच वर्षांनंतर पोलिसांत धाव घेण्यात आली. विशेष म्हणजे तक्रार दिल्यानंतर (जून २०२१) तब्बल एका वर्षानंतर संशयित आरोपी दांपत्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रमा देवेंद्र राजपूत आणि देवेंद्र राजपूत (रा. साई प्रिंटिंग, पॅकेजिंग इंडस्ट्रीज, एमआयडीसी, धुळे) अशी त्या संशयित दांपत्यांची नावे आहेत.

फिर्यादी अशोक यादवराव बेडसे हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत १९८८ पासून बेडसे पल्स कन्व्हर्जन इंडिया ही कंपनी चालवितात. क्राफ्ट पेपर रोल तयार करून विक्री करतात. त्यांची आठ वर्षांपूर्वी राजपूत दांपत्याशी ओळख झाली होती. राजपूत हे बेडसेंकडून कच्चा माल म्हणून क्राफ्ट पेपर नेत असत. २०१५ मध्येही कच्चा माल खरेदी केला होता. त्यानंतरही तीन-चार वेळा राजपूत यांनी माल खरेदी करून वेळेत पैसे दिल्याने बेडसेंचा विश्वास बसला होता.

पावणे १३ लाखांपैकी साडेसात परत केले, पण....

राजपूत यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये एकदा आणि मार्च महिन्यात चार वेळेस असे पाच वेळा १२ लाख ७६ हजार ४९२ रुपयांचा कच्चा माल खरेदी केला होता. सदर माल खरेदी करताना इंद्रमा यांच्या पंजाब नॅशनल बँकेचा वरील रकमेचा धनादेश १३ नोव्हेंबर २०१९ या तारखेचा दिला. बेडसेंनी सिडकोतील त्यांच्या खात्यात टाकलेला सदर धनादेश अकाउंट डॉरमंटमुळे दुसऱ्याच दिवशी न वटता परत आला. यासंदर्भात बेडसेंनी राजपूत यांना संपर्क केला मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्याचे आश्वासन दिले. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने बेडसेंनी अखेर २३ जून २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार दिली.

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले असता, राजपूतने २१ जुलै रोजी प्रत्यक्ष येऊन मागील दोन वर्षांपासून कंपनी बंद असल्यामुळे पैसे देता आले नाही, परंतु एकाच आठवड्यात संपूर्ण पैसे देतो अशी लेखी विनंती केली. त्यानंतर राजपूतने ७ लाख ४९ हजार ८०० रुपये परत केले. परंतु त्यानंतरचे उर्वरित ५ लाख २६ हजार ६९२ रुपये देण्यासाठी टाळाटाळ करत फसवणूक केल्याने अखेर राजपूत दांपत्यांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक घुगे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT