aurangabad love crime boyfriend setting himself on fire and hug girl friend
aurangabad love crime boyfriend setting himself on fire and hug girl friend Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News : एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी  

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : संशोधन करणाऱ्या युवकाने एकतर्फी प्रेमातून स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर विद्यार्थिनीला मिठी मारली. ही खळबळजनक घटना विद्यापीठ लेणी परिसरातील शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था परिसरात सोमवारी दुपारी घडली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गजानन खुशालराव मुंडे (वय २९,मूळ रा. परभणी जिल्हा) असे तरुणाचे नाव आहे. तरुणी मूळची सिल्लोड तालुक्यातील आहे.
संबंधित तरुणी सकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेत जीवभौतिकशास्त्र विभागात संशोधन करते तर गजानन हा प्राणिशास्त्र विषयात संशोधन करतो.

मागील काही दिवसांपासून गजानन हा तरुणीचा पाठलाग करत होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. आज सकाळी तरुणी संस्थेतील प्राध्यापिकेला भेटण्यासाठी गेली होती, याची कुणकुण लागताच गजानन तिचा पाठलाग करत संस्थेत दाखल झाला. जाताना त्याने पेट्रोलची बाटली नेली होती. तरुणी प्रयोगशाळेत असताना गजाननने स्वतःवर पेट्रोल ओतले. उरलेले तरुणीच्या अंगावर फेकत स्वतःला पेटवून घेतले आणि तिला मिठी मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित प्रा. वैशाली वाडेकर यांनी तरुणीला बचावासाठी पळ काढण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत ती आगीच्या ज्वाळांत वेढली गेली होती.

बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
साधारण एक ते दीड महिन्यांपूर्वी संशयित तरुण आपणांस शिवीगाळ व माझा पाठलाग करत असल्‍याची तक्रार तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिली होती. परंतु तक्रार दिली तरी कुटुंबीयांना कळू देऊ नका, अशी विनंती तिने पोलिसांना केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT