file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

इंग्रजी शाळांसाठी करा स्वतंत्र संरक्षण कायदा 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - आरटीईच्या जाचक अटी रद्द कराव्यात तसेच इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करण्यात यावा असे ठराव महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोशिएशन (मेस्टा) च्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. 

येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजित दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनाचा रविवारी (ता.16) समारोप झाला, या समारोप सत्रात सात ठराव मंजूर करण्यात आले. या दोन दिवशीय अधिवेशनात पाश्‍चात्य शिक्षण पध्दती व भारतीय शिक्षण पध्दती यांची तुलना त्याचबरोबर आरटीई धोरणांची अंमलबजावणी या विषयावर पॅनलने चर्चा करण्यात आली.

 इंग्रजी शाळा चालवताना भेडसावणाऱ्या समस्या व शासनाने पुरवाव्या लागणाऱ्या सुविधा यासंदर्भात मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. शाळांना कमर्शियल टॅक्‍स आकारणी करु नये, इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करण्यात यावा, आरटीईच्या जाचक अटी रद्द कराव्यात, 25 टक्के आरक्षित विद्यार्थ्यांना फी परतावा विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन पाठवावा, आरटीई प्रवेशाची प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावी, आरटीई आरक्षणानुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, शाळेचा गणवेश, शालेय साहित्य, वह्या, पुस्तके शासनाने मोफत द्यावे.

ज्या शाळा आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पात्र ठरविल्या गेल्यानंतर त्यांना त्वरीत आरटीई प्रमाणपत्र वितरीत करावे, आरटीई प्रवेश देत असलेल्या शाळेतील पात्र शिक्षकांना शासनाने मिनीमम पेन्शन लागू करावी, इंग्रजी शाळेच्या शिक्षकांना शासनाने प्रशिक्षण द्यावे आदी ठराव मंजूर करण्यात आले. 
अधिवेशनानिमित्त एज्यूकेशनल फेअर घेण्यात आली. यात अनेक शैक्षणिक संस्थांनी, अभ्यासाचे साहित्य पुरवठादार, गणवेश पुरवठादार आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी इंटरस्कूल डान्स कॉम्पीटीशन, बेस्ट टिचर्स ऍवार्ड, बेस्ट स्कूल अवॉर्डचे वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमासाठी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे, सचिव डॉ. सतीश गोरे, कोषाध्यक्ष मनिष हांडे, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शिरीष बोराळकर, डॉ गजानन नारे, संतोष सोनवणे, मेस्टाच्या महिला जिल्हाध्यक्ष अर्चना अहिरे, राजू नगरकर, शहराध्यक्ष कविता सोनवणे, सोमनाथ वाघमारे, सचिन मलिक यांची उपस्थिती होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT