Aurangabad monsoon first heavy rain Power outages
Aurangabad monsoon first heavy rain Power outages sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पहिल्याच पावसात दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात माॅन्सूनपूर्व पहिल्याच जोरदार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक भागात वीज गूल झाली. अनेक भागात अंधार पसरला. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांनी युध्दपातळीवर दुरूस्तीची कामे हाती घेतली असून जस-जशी कामे पूर्ण झाली त्याप्रमाणे उशिरापर्यंत  वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पहिल्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या या वादळी पावसाने शहरातील अनेक भागात लाईन फॉल्ट झाला. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा बंद झाला होता. चिकलठाणा, पडेगाव, पावरहाऊस, हर्सुल परिसर, छावणी, मिलकॉर्नर, नंदनवन कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, पेन्शनपुरा, गवळीपुरा, भुजबळनगर, शांतीपुरा, बिल्डर्स सोसायटी, भावसिंगपुरा, पेठेनगर, श्रावस्ती कॉलनीसह शहरातील अन्य भागातील वीज पुरवठा बंद झाला.

शहरातील विविध भागात लाईन फॉल्ट झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी-अभियंते -कर्मचारी यांनी आपआपल्या भागातील लाईन फॉल्ट शोधून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली. लाईन फॉल्ट शोध मोहिम युध्दपातळीवर सुरू करून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. जस-जशी लाईन फॉल्टची कामे पूर्ण केली जातील त्या त्या भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू होईल, असे शहर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT