छत्रपती संभाजीनगर

चमकोगिरी करणाऱ्यांमुळे पक्ष लयास गेला असं कोण म्हणाले

शेखलाल शेख

औरंगाबाद : पाच वर्षे पक्षापासून दूर असलेले कार्यकर्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उगवू लागले आहे. अशा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवून निष्ठावंत, महिला, तरुणांना उमेदवारी द्या अशा सूचना रविवारी (ता. 19) गांधी भवनमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मांडल्या. अनेकदा बैठकीत रिकामे राहणारे गांधी भवन रविवारच्या बैठकीत मात्र हाऊसफुल्ल झाले होते.

महापालिका निवडणूक आता जवळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेण्यासाठी शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी ही बैठक बोलावली होती. सत्ता गेल्यानंतर काही कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्तेही पक्षापासून दूर गेले. गेल्या पाच वर्षांत जनतेच्या प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये तसेच कार्यक्रमांकडे अनेकांनी पाठ फिरवली. पक्षाचे पद घेतले मात्र पक्षाच्या कामासाठी आले नाहीत. असे लोक आज गांधी भवनात धडकल्याचे पाहून पडत्या काळात पक्षासोबत असणाऱ्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. एअरपोर्ट, गेस्ट हाऊस, दिल्ली-मुंबई फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळेच पक्ष लयास गेला असल्याचे यावेळी काही जणांनी बोलून दाखविले. 

उमेदवार निवडून येण्याचे निकष ठरवावे 

पक्षाने उमेदवाराला आर्थिक मदत करायला हवी. स्थानिक निवडणूक असल्याने महाआघाडी न करता स्वतंत्र लढावे. युवक कॉंग्रेस, एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. सक्रिय महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. महिला आरक्षणाच्या नावाखाली सक्रिय कार्यकर्तीला डावलून कार्यकर्त्यांच्या बायकोला, भावजयीला उमेदवारी देण्याचे टाळावे. उमेदवार निवडून येण्याचे निकष ठरवावे.

महाआघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी. जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जावे. नागपूरला अपंग सेलचा एकमेव नगरसेवक निवडून आलेला आहे, त्याचप्रमाणे इथेही अपंग सेलला-वॉर्डात उमेदवारी देण्यात यावी अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या.

यावेळी युसूफ मुकाती, अनिल माळोदे, शेख मुख्तार, नीलेश अंबेवाडीकर, संतोषकुमार दीडवाले, महेंद्र रमंडवाल, शिवा गवळे, युनूस पटेल, मुनीर पटेल, संदीप जाधव, मुज्जफ्फर खान, मुठ्ठे पाटील, इब्राहीम पठाण, चंद्रभान पारखे, मुदस्सर अन्सारी, मीनाक्षी देशपांडे, सरोज मसलगे पाटील, सय्यद जाकेर, सुरेखा पानकडे, भाऊसाहेब जगताप यांनी आपले मते मांडली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT