Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

Video : ती बाई पोलिसाला अशी कडकडून चावली की... 

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर त्या जागेला तारेचे कुंपण करण्यास विरोध करीत एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मयूरबन वॉर्डातील राजनगरात मंगळवारी (ता. 28) सायंकाळी घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पण यावेळी तिने सहायक पोलिस निरीक्षकांना चावा घेतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मयूरबन कॉलनीत राजनगर सोसायटीच्या सुमारे आठ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण झाले होते. सोसायटीची ही खुली जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती; मात्र महापालिकेच्या शाळेलगतच हे अतिक्रमण करण्यात आले. या भागातील नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याची मागणी महापालिकेकडे केली होती.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अधिकारी कारवाई करीत नसल्याने त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर मात्र महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने 21 जानेवारीला हे अतिक्रमण हटविले. यावेळी साहित्य घेण्यासाठी कोणी समोर आले नव्हते. साहित्य तसेच पडून असल्याने परिसरातील नागरिकांनी सोमवारी (ता. 27) पुन्हा आयुक्तांची भेट घेतली.

आयुक्तांनी खुल्या जागेला तार फेन्सिंग करण्याचे आदेश दिले. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे पथक मंगळवारी पोलिसांना सोबत घेऊन दुपारी या ठिकाणी पोचले. यावेळी काही जण तिथे आले व विरोध केला. ही जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगत तार फेन्सिंग करण्यास विरोध केला. 

पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांना शिविगाळ 

पथकाने जमावाच्या विरोधाला न जुमानता काम सुरू केले. त्यामुळे जमावातील काहींनी पथकातील अधिकारी व पोलिसांना अवार्च्य भाषेत शिवीगाळ केली. त्याचवेळी गंगूबाई काळे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतले व स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत या महिलेला आणि इतर दोघांना ताब्यात घेतले.

यावेळी तिने सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना चावा घेतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारानंतर महापालिकेच्या पथकाने तार फेन्सिंगचे काम पूर्ण करून हा भूखंड ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT