amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

साडेसहा तास ते तिघे होते पाइपलाइनमध्येच

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- सातशे मिलिमीटर व्यासाची जमिनीखालील पाइपलाइन आणि त्यातून रांगत 200 मीटरपर्यंत जाऊन तब्बल साडेसहा तास दुरुस्तीचे काम तीन पाणबुड्यांनी केले. सायंकाळी 4.40 वाजता पाइपमध्ये गेलेले तिघे रात्री 11 वाजता बाहेर आले. 

रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक रस्त्याखालून महापालिकेची 700 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन जाते. ही पाइपलाइन 1975 मध्ये टाकण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिला गळती लागली आहे. पाइपवरून वरून सिमेंटचा रस्ता असल्याने गळती कुठे सुरू आहे हे शोधणे महापालिकेला अवघड झाले होते. गळती मोठी असल्याने पाणी पाझरून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या बंगल्यातील तळघरात येत होते. त्यामुळे गेल्या महिन्यात नागरिक व वॉर्डाचे नगरसेवक विकास जैन यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती.

आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी तीन दिवसांपूर्वीच पाहणी केली. यावेळी त्यांनी पाइपलाइनची गळती सात दिवसांत बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. अधिकाऱ्यांनी गळत्यांचा शोध घेतला; मात्र नेमके पाणी कुठे पाझरत आहे, याची तपासणी केली. मात्र गळत्या सापडल्या नाहीत. मात्र पाइपलाइनचे जॉइंट जागोजागी निखळले असावेत, असा अंदाज व्यक्त होता.

आयुक्तांनी केली पाहणी 
पाइपलाइनमध्ये काम सुरू असताना उपअभियंता किरण धांडे हे रस्त्यावर उभे होते. दरम्यान, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

नुकताच रस्ता तयार करण्यात आल्याने तो खोदणे अशक्‍य होते. त्यामुळे महापालिकेने मुंबईहून पाणबुड्यांना पाचारण केले. समुद्रातून जाणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात हातखंडा असलेले हे पाणबुडे बुधवारी शहरात दाखल झाले. गोल्डी टॉकीजसमोर मोठा खड्डा खोदून याठिकाणी पाइपलाइनला छिद्र करण्यात आले व सायंकाळी साडेचार वाजता हे पाणबुडे त्यातून पाइपलाइनमध्ये गेले.

ऑक्‍सिजन मास्क लावून रांगत पुढे-पुढे जात त्यांनी पाइपलाइनच्या गळत्या शोधून काढल्या. सुमारे दोनशे मीटरपर्यंत अंतरात असलेले 44 जॉइंट तपासण्यात आले. विशेष केमिकल व पावडरद्वारे जॉइंटद्वारे होणारी पाणी गळती थांबविली. महाराष्ट्र अंडर वॉटरचे विजय शिवतारे, प्रमोद व राजू यादव या तिघांनी हे काम केले. रात्री 11 वाजता ते पाइपलाइनमधून बाहेर आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT