Aurangabad Paithan municipal election voter list corporators
Aurangabad Paithan municipal election voter list corporators sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पैठणच्या मतदार यादीत कटकारस्थान?

सकाळ वृत्तसेवा

पैठण : पैठण नगर पालिकेची निवडणुकीची प्रभागनिहाय मतदार यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. मात्र, या यादीत बाराही प्रभागांच्या यादीत मोठा घोळ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिका कर्मचारी आणि माजी नगरसेवकांकडे अंगुली निर्देश करण्यात आला आहे.

या यादीबद्दल नागरिकांनी शंका उपस्थित केली असून नागरिकांची घरे दुसरीकडे त्यांची नावे तिसऱ्याच ठिकाणी असा प्रकार घडली असून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्जितल्या काही माजी नगरसेवकांना हाताशी घेऊन त्यांच्या मताप्रमाणे घरी बसून याद्या तयार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यादीत प्रभागाव्यतिरिक्त इतर प्रभागांतील मतदारांची नावे आहेत. पैठण नगर पालिकेची प्रभाग प्रारूप मतदार यादी २१ जून रोजी प्रकाशित करण्यात आली. यादी आता स्थानिकांच्या हाती आली आहे.

या याद्यांचे निरीक्षण केले असता बहुतांश भागातील प्रभाग यादीत दुसऱ्याच प्रभागातील नावे समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे. यात पाच-दहा नावे चुकीने इकडे-तिकडे जाऊ शकतात. मात्र, ५० ते ६० हुन अधिक नावे ही दुसऱ्या प्रभागाच्या यादीत गेल्याने दिसून आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे.

याद्या बाबत नागरिक संतप्त!

हा घोळ प्रभागातील पुढारी मंडळीच्या लक्षात आल्याने या बेजबाबदार कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्यांनी सुद्धा यावर लक्ष घालून तशा तक्रारी पालिकेत पुराव्यानिशी द्यावात, असे आवाहन केले जात आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी नियमावलीनुसार प्रभाग रचना केली. मग प्रभागानुसार याद्या का नाही केल्या, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT