Aurangabad Potul station Devagiri Express robbery Accused arrested by police
Aurangabad Potul station Devagiri Express robbery Accused arrested by police sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकणारे आरोपी कारागृहात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पोटूळ स्‍टेशनवर थांबलेल्या देवगिरी एक्सप्रेसवर दगडफेक करून रेल्वेतील प्रवासी महिलेची अडीच लाख रुपये किंमतीची सोन साखळी लांबविल्याप्रकरणी आरोपी जावेद ऊर्फ निल्या तुळसीराम पवार (वय २४, रा. डोमेगाव ता. गंगापूर) यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी सोमवारी दिले. आरोपी जावेद ऊर्फ निल्या पवार याला ११ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर १ मे रोजी आरोपी शिवानंद काळे याला अटक करण्‍यात आली होती.

आरोपींकडून चोरी गेलेल्या अडीच लाख रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनी सोन्याची साखळी पैकी २६ ग्रॅम सोनसाखळी जप्‍त करण्‍यात आली आहे. प्रकरणात लक्ष्‍मी नुने प्रभाकर (रा. करापुरकर चाळ, जेबी मार्ग एल्फीस्‍टन रोड मुंबई) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपासा दरम्यान चोरीला गेलेली सोनसाखळी विक्री करण्‍यासाठी शिवानंद काळेसह तिची मुलगी ऐक्शन आणि चिवक वांग्या पवार असे तिघे

औरंगाबादेत आले होते.

त्यावेळी लोहमार्ग स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आरोपी शिवानंद काळे याला अटक केली. गुन्‍ह्यात आरोपी शिवानंद काळे याचा भाऊ चिवा काळे आणि मुलगी ऐक्शन काळे यांच्‍यासह वांग्या पवार, निल्या पवार, किशोर कांताराज पवार व कबुतर राजू काळे यांचा देखील सहभाग असल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT