amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

असा फुटला ठाकरे स्मारकाच्या डीपीआरचा फुगा...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- महापालिकेतर्फे सिडको भागात उभारल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या डीपीआरचा (सविस्तर प्रकल्प अहवाल) फुगलेला फुगा फुटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्मारकाचा डीपीआर बदलण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जुन्या 64 कोटींच्या डीपीआरचा आकडा 25 कोटी 49 लाखांवर आला आहे. 

महापालिकेतर्फे सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. सुमारे एक हजार झाडे तोडली जाणार असल्याने स्मारक वादात सापडले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मारकावरून टार्गेट केले होते. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये ट्‌विटर वॉर रंगले. दरम्यान, औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्मारकाचा डीपीआरदेखील पाहिला व कमीत कमी बांधकाम करून, झाडे न तोडता स्मारक उभारा, त्यासाठी सुधारित डीपीआर तयार करण्याचे व सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी घेऊन तो शासनाकडे सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेली पीएमसी आर्कहोमने सुधारित डीपीआर तयार केला. 25 कोटी 49 लाख रुपयांचा हा डीपीआर आहे. महापालिकेने तयार केलेला जुना डीपीआर 64 कोटी रुपयांचा होता. तो आता थेट 25 कोटींवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने फुगविलेल्या स्मारकाच्या डीपीआरचा फुगा पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर फुटला आहे. मात्र आधीच्या डीपीआरमध्ये कन्स्ट्रक्‍शनचा खर्च अधिक होता. आता कन्स्ट्रक्‍शन मोठ्या प्रमाणावर वगळण्यात आले आहे. त्यामुळे खर्च कमी झाल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. 

असा आहे सुधारित डीपीआर 
नव्या डीपीआरमध्ये 16 हजार चौरस फुटांत आवश्‍यक बांधकाम, पार्किंग, आर्ट गॅलरी, बाळासाहेबांचा पुतळा, त्यालगतच भव्य संग्रहालय, फूड कोर्ट, जागोजाग माहितीचे फलक अशा कामांचा समावेश आहे. हे 20 कोटी 97 लाख रुपयांतून केले जाणार आहे. उर्वरित खर्च हा जीएसटी, पीएमसी शुल्क, थर्ड पार्टी तपासणी शुल्क, टेस्टिंग चार्जेस असा असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता.20) सांगितले. 

सरकारने ठरविली होती 10 कोटींची मर्यादा 
तत्कालीन भाजप सरकारने महापालिकेला पत्र पाठवून बाळासाहेबांचे स्मारक 10 कोटी रुपयांतच करावे, असे आदेश दिले होते. त्यावेळी महापौरांनी मात्र ठाकरे स्मारक 64 कोटींतूनच होणार, असा विश्‍वास व्यक्‍त केला होता. या किमतीनुसारच निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT