याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने

मनोज साखरे
Monday, 20 January 2020

सिकंदरने औरंगाबाद, नगर, जालना, नांदेड, जळगावसह नागपूर, अमरावतीसह विविध शहरांत घरफोड्या केल्या आहेत. त्याला गांजाचे व्यसन असून, मटक्‍याचा जुगारही तो खेळतो. मागे त्याने चोरीतून मिळवलेले लाखो रुपये  उधळले आहेत. त्याच्यावर सुमारे चाळीस गुन्ह्यांची नोंद आहे.
 

औरंगाबाद : सिडको एन-चार भागात घर फोडून सुमारे 70 तोळे सोने व पावणेपाच लाख रुपये लांबविणाऱ्या कुख्यात व शौकीन घरफोड्याला पुंडलिकनगर पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने रविवारी (ता. 19) बेड्या ठोकल्या.

गत बावीस दिवसांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. या चोरीनंतर तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुंडलिकनगर पोलिस मोठे कष्ट घेत होते.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (रा. बीड) असे संशयिताचे नाव आहे.

तो कुख्यात घरफोड्या आहे. त्याने राज्यात विविध ठिकाणी हैदोस घातलेला आहे. अमरावतीतून निवृत्त झालेले शल्यचिकित्सक डॉ. नामदेव गोविंदराव कलवले पत्नी चंद्रभागा, मुलगा डॉ. समीर आणि सूनबाई डॉ. सारिका आणि नात अनुष्का औरंगाबादेतील सिडको एन-चार येथे राहतात.

डॉ. कलवले यांची मुंबई येथील मुलीकडे जावळाचा कार्यक्रम होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय 28 डिसेंबरला मुंबईला गेले होते. यानंतर 30 डिसेंबरला सकाळी बंगल्यात चोरी झाल्याचे उघड झाले होते. यानंतर पोलिसांनी घरफोडीचा कसून तपास सुरू केला. यानंतर सिकंदरला पकडले.

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

त्याच्याकडून काही ऐवजही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे त्यांचे पथक; तसेच नगर येथील पोलिस कर्मचारी दत्ता हिंगडे, अण्णा पवार, सुनील चव्हाण यांनी केली.

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

राज्यभर कारनामे
सिकंदरने औरंगाबाद, नगर, जालना, नांदेड, जळगावसह नागपूर, अमरावतीसह विविध शहरांत घरफोड्या केल्या आहेत. त्याला गांजाचे व्यसन असून, मटक्‍याचा जुगारही तो खेळतो. मागे त्याने चोरीतून मिळवलेले लाखो रुपये आयपीएलवर उधळले आहेत. त्याच्यावर सुमारे चाळीस गुन्ह्यांची नोंद आहे.

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Notorious Thief Arrested Aurangabad News