sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : सावधान, कोरोना पुन्हा परतला!

सिडकोत मुलीसह महिला पॉझिटिव्ह; जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अहवाल पुण्याला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : केरळसह राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे पुन्हा लाट येणार का? या भीतीने नागरिक चिंतेत असतानाच गुरुवारी (ता. २१) नको तेच घडले. सिडको एन-७ भागातील दहा वर्षीय मुलीसह एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

त्यामुळे आरोग्य विभागाने चिंता आणखी वाढली आहे. या दोघींचे अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे रुग्‍ण नव्या व्हायरसचे आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गुरुवारी आणखी २९ रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्याचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील संशयित रुग्णांची अ‍ॅण्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करावी, तसेच आरटीपीसीआरचे स्वॅब घाटीच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांत पाठविलेल्या नमुण्यांपैकी दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

यासंदर्भात सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले की, ६६ रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी २१ रुग्णांचे आरटीपीसीआर स्वॅब घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील १९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर सिडको एन-७ भागातील दहा वर्षांची मुलगी आणि ६५ वर्षीय महिला या दोघींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघींच्या नातेवाइकांशी संपर्क केला असता, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. या दोघींना सात दिवस घरातच उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दोघींच्या संपर्कातील नातेवाइकांनीदेखील कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.

सहा महिन्यानंतर रुग्ण

कोरोना संसर्गाची साथ संपली असली तरी शहरात शेवटच्या रुग्णाची नोंद सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये झाली होती, असे डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले. घाटी रुग्णालयाने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी या रुग्णांचे अहवाल पाठविले असतील, त्याचा अहवाल आल्यानंतर हे रुग्ण नव्या व्हेरिएंटचे आहे का? हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT