

Panand road scheme Maharashtra news
esakal
Farm road scheme Maharashtra : ‘‘शेत-शिवारातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांचे जीवनमार्ग असून त्यांच्या सुलभ हालचालीसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविणार आहे,’’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील अभियानाचा प्रारंभ रविवारी (ता. १९) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार असल्याचेही सांगितले.