

Mumbai Water Supply
ESakal
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, आजच्या (ता. २) आकडेवारीनुसार एकूण उपयुक्त साठा केवळ ३८.८६ टक्के शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (३५.०६ टक्के) साठा किंचित जास्त असला तरी, उन्हाळ्याचे दोन मुख्य महिने शिल्लक असल्याने पालिकेसमोर पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.