Traffic Jam on Nilajgaon to Shekta Phata Road esakal
छत्रपती संभाजीनगर

Bidkin Traffic : बिडकीन शहरातील 'या' मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरवर्ग, शालेय विद्यार्थी, वाहनधारकांना नाहक त्रास

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निलजगाव फाट्यापर्यंत रस्त्याची पार वाईट दुर्दशा झाली.

सकाळ डिजिटल टीम

जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामामुळे रोडच्या एका बाजूला माती, मोठाले दगड मिश्रित मुरूम टाकण्यात आला आहे.

बिडकीन : बिडकीन शहरात (Bidkin) निलजगाव फाटा (Nilajgaon Phata) ते शेकटा फाटा अशा जलवाहिनीचे काम सुरू आहे. जलवाहिनीचे काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. नोकरवर्ग, शालेय विद्यार्थी, गावकरी, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निलजगाव फाट्यापर्यंत रस्त्याची पार वाईट दुर्दशा झाली असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप होत आहे. संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालयासमोर समांतर जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामामुळे रोडच्या एका बाजूला माती, मोठाले दगड मिश्रित मुरूम टाकण्यात आला आहे.

त्याला व्यवस्थित दाबलेले नाही. या ठिकाणी मोठ्या वाहनाला मनाई केलेली आहे, तरी ही लोडिंग ४०७, कंपनीच्या मिनी बस, खडी, डांबर वाहतूक करणारे मिनी टेम्पो व ढंपर असे विविध वाहने सुरू असल्याने लहान वाहने अडकून वाहतूक कोंडी होत आहे. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदार, कामगार वर्ग नुसती बघ्याची भूमिका घेत मनमर्जी, दुर्लक्ष करीत संथ गतीने काम करीत आहेत.

Traffic Jam on Nilajgaon to Shekta Phata Road

कृपया प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खोदलेल्या नालिमधील पाणी रोडवर सोडल्याने चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच २ ते ३ दिवसांपूर्वी एसबी शाळेसमोर कंपनीची मिनी बस व दुचाकीचा अपघात झाला होता. त्याचबरोबर दुचाकीस्वारांना चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जिल्हा परिषद शाळेला जायला रस्ता नाही, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी जीवघेणी कसरत करावी लागते, तरी ही ठेकेदार बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, छोटे वाहनधारक, नोकरवर्ग, गावकऱ्यांकडून जड वाहनांवर कार्यवाही तर नालितील पाणी सोडण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT