Crime News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News: कपड्यांचे माप देऊन घरी परतणाऱ्या नवरदेवावर गोळीबार, साडेसात हजार रुपयांसाठी केली हत्या

कपड्यांचे माप देऊन घरी परतणाऱ्या नवरदेवावर गोळीबार

सकाळ डिजिटल टीम

साडेसात हजार रुपये दिले नाही म्हणून एकाने तरुणावर गोळीबार करत त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री पावणे आठ दरम्यान बायजीपुऱ्यातील गल्ली क्र.१४ मध्ये घडली. अल कुतुब हबीब हमीद (३०, रा. गल्ली क्र. १४, इंदिरानगर, बायजीपुरा) असे मृताचे नाव असून फय्याज बशीर पटेल (वय अंदाजे २८) असे मारेकऱ्याचे नाव आहे. तर समीर बशीर पठाण हा जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाचे म्हणजे आरोपी हा वीस फुटांवरुन गोळी झाडत आला होता, पहिली गोळी शटरला लागली, दुसरी शेजारी बसलेल्या एका तरुणाला लागली तर तिसरी गोळी छातीत लागल्याने अल कुतूब ठार झाला. मृत अल कुतुबचे केवळ ११ दिवसांवर लग्न आले होते.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी फय्याज हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. मृत अल कुतुबकडे आरोपी फय्याज पटेलचे साडेसात हजार रुपये होते. वारंवार मागूनही अल कुतुब पैसे देत नव्हता. बुधवारी सायंकाळी अल कुतुब हा गल्ली क्रमांक १४ मधील हयात हॉस्पिटलच्या कट्ट्यावर बसला होता. हॉस्पिटल आणि मेडिकल शेजारीच असून तीन सलग शटर आहेत. हॉस्पिटलसमोर बुद्धविहार आहे.

हॉस्पिटल आणि बुद्धविहार या दोन्हीत साधारण १५ ते २० फुटांचा रस्ता असून आरोपीने बुद्धविहाराच्या दिशेने येत विहाराच्या दारातूनच पहिली गोळी झाडली. ती शटरवर लागली. तशीच दुसरी गोळी झाडली पण ती समीर नावाच्या तिथे बसलेल्या तरुणाच्या हाताला लागली. तिसरी गोळी अल कुतुबच्या छातीत लागली आणि तो ठार झाला. समीरचा या कशात सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही घटना कळताच पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांच्यासह आसपासच्या सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. विशेष म्हणजे गोळीबार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी हजारोंचा जमाव जमला होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली होती.

कोण आहे मृत?

मृत अल कुतुब हा कापड दुकानात काम करून उदरनिर्वाह भागवित होता. तो एकुलता मुलगा होता. येत्या २० ऑगस्टलारोजी त्याचे लग्न होते. त्याने घटनेच्या काही वेळापूर्वी कपडे शिवायला टाकले आणि तो रस्त्याने जात असताना हा प्रकार घडला. त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याने तो आणि आई असे दोघेजण राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT