Chhatrapati Sambhaji Nagar Emotional Appeal of Class 10th 12th Students Sir pass me if I fail I will get married
Chhatrapati Sambhaji Nagar Emotional Appeal of Class 10th 12th Students Sir pass me if I fail I will get married  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : सर, मला पास करा, नापास झाल्यास लग्न लावून देतील!

संदीप लांडगे

छत्रपती संभाजीनगर : ‘सर, मला पास करा, नापास झाल्यास घरचे लग्न लावून देतील, त्यामुळे पुढचे शिक्षण घेता येणार नाही,’ असे भावनिक आवाहन बारावीच्या पेपरमध्ये एका विद्यार्थिनीने केले आहे. तर एका विद्यार्थ्यांने म्हटले की, मी खूप गरीब असून आमच्यावर खूप कर्ज आहे, मला पास केल्यास चांगली नोकरी करून कर्ज फेडू शकेल. उत्तरपत्रिकांमध्ये असे मथळे लिहिलेले पाहून शिक्षकही अचंबित झाले आहेत.

दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून दहावीच्या परीक्षेला एक लाख ८० हजार २१०; तर बारावीच्या परीक्षेला एक लाख ६८ हजार २६३ असे एकूण ३ लाख ४८ हजार ४७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा राज्यात कॉपीमुक्त मोहीम राबविण्यात आली होती.

त्यामुळे गैरप्रकाराला आळा घालण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे. अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपीअभावी अनुत्तीर्ण होण्याची भीती होती. अनुत्तीर्ण झाल्यास कुटुंब, नातेवाइकांमध्ये आपली बदनामी होईल, या भीतीने काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्याऐवजी भावनिक नोट लिहून ठेवल्या आहेत.

याबाबत शिक्षकाने सांगितले, की एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिले आहे की, सर! मला पास करावे. माझ्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. आमच्यावर खूप कर्ज आहे. मी पास झालो तर, चांगली नोकरी करून सगळे कर्ज फेडणार आहे. एका विद्यार्थिनीने,‘ मला पास करावे, नाहीतर घरचे लग्न लावून देतील. त्यामुळे पुढील शिक्षण घेता येणार नाही,’ असे लिहिले आहे.

निकाल घटण्याची शक्यता

बारावी बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोऱ्याच ठेवल्याचे दिसून आले आहे. यावर्षी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती.

दोन वर्षे परंपरागत शिक्षण न झालेले विद्यार्थी यावेळी दहावी बारावीच्या परीक्षांना बसले होते. यामुळे यंदा निकालाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाचा हा परिणाम असल्याचे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी विद्यार्थी उत्तरपत्रिकांवर काहीतरी मजकूर लिहीत असतात. विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह लेखन केल्यास सदर विषयाची संपादणूक रद्द करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदा शिक्षण मंडळाने शिक्षा सूची जाहीर केली होती. ही सूची प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना समजून सांगावी, असे कळविले होते.

-विजय जोशी, सचिव, विभागीय मंडळ, छत्रपती संभाजीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT