Samruddhi Mahamarg  sakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg : सक्तीच्या समुपदेशनामध्ये भावनिक साद ; समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांचा वर्ग

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १ हजार २३९ अपघात झाले. यामध्ये १४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापुढे या महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी वेगाचा थरार अनुभवणाऱ्या वाहनचालकांना थांबवून सक्तीने त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १ हजार २३९ अपघात झाले. यामध्ये १४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापुढे या महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी वेगाचा थरार अनुभवणाऱ्या वाहनचालकांना थांबवून सक्तीने त्यांचे समुपदेशन केले जात आहे. दहा महिन्यांत नागपूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान तब्बल ३ हजार २४७ वाहनचालकांना या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना अपघाताचे विदारक व्हिडिओ दाखवून तुमच्या पश्चात तुमच्या चिमुकल्यांचे अन् कुटुंबाचे काय होईल, अशी भावनिक साद घालत समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग विविध पद्धतींनी प्रयत्न करत आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर अपघाताची मालिका सुरू झाली होती. त्यामुळेच परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे उपआयुक्त भारत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून बेदरकार वाहने चालविणाऱ्या चालकांचे सक्तीने समुपदेशन करण्यात येत आहे. यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा प्रत्येक जिल्ह्याच्या एक्झिट पॉइंटला समुपदेशन केंद्रे सुरू केलेली आहेत.

व्हिडिओतून तीव्रता

समृद्धीवर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई तर होतच आहे, शिवाय अशा चालकांचे सक्तीचे समुपदेशन केले जात आहे. वेगमर्यादा ओलांडलेल्या चालकाला अर्धा ते एक तासापर्यंत समुपदेशन कक्षात बसविले जाते. या ठिकाणी अपघाताचे विविध विदारक व्हिडिओ दाखविले जातात. ‘तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचे काय होईल?’ अशी भावनिक सादही घातली जात आहे. याशिवाय काही चालकांची परीक्षाही घेतली जात आहे. या समुपदेशन केंद्रावर अर्धा ते एक तास खर्च झाल्यानंतर संबंधित चालक भानावर येतो. पुढे समृद्धीवरच्या प्रवासात त्याच्या वाहनावर लक्ष ठेवले, तेव्हा त्याच्या वाहनाचा वेग अधिक वाढत नाही, असा अनुभव असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • परिवहन कार्यालय------संगणकीय समुपदेशन---------आरटीओ निरीक्षकांमार्फत समुपदेशन

  • नागपूर-------------------६६७-------------------७८५

  • वर्धा---------------------११९--------------------७०

  • अमरावती-------४००------------------------------४०२

  • वाशीम----------६८------------------------१०५

  • बुलडाणा---------०---------------------०

  • जालना----------३८------------------२०८

  • छत्रपती संभाजीनगर------------३४२-----------४३

  • एकूण----------१६३४---------१६१३----------३२४७

वेगाचा थरार टाळा

  • - वेगाचा थरार अनुभवण्याचा मोह टाळा.

  • - वाहनांची स्थिती योग्य आहे, याची खात्री करावी.

  • - कुठल्याही परिस्थितीत वेगमर्यादा ओलांडू नये.

  • - अनावश्यक लेन कटिंग टाळा.

  • - ‘समृद्धी’वर इतर वाहनाशी स्पर्धा करू नका.

  • - सावकाश, संथ वाहन चालवा.

कारवाईचाही बडगा

‘समृद्धी’वर ट्रकसाठी ताशी ८० तर कार व हलक्या वाहनांसाठी १२० चा वेग निश्चित केलेला आहे. ही वेगमर्यादा ओलांडलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी स्पीडगन लावल्या आहेत. स्पीड ओलांडलेल्या वाहनांना दंड तर लावलाच जातो, शिवाय त्या चालकांचे समुपदेशन करण्यासाठी त्याचा किमान तासभर वेळ घेतला जात आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या रोखण्यासाठी समुपदेशन केंद्रे सुरू केलेली आहेत. वाहनांचा वेग वाढणाऱ्या, लेन कटिंग करणाऱ्या किंवा बेदरकार वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून समुपदेशन केंद्रावर त्याचे समुपदेशन केले जाते.

— विजय काठोळे, प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT