Corona News Aurangabad
Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

ऐकावे ते नवलच...नाक्यावर निघाला पॉझिटीव्ह, शहरात आल्यावर निगेटीव्ह

माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजना चांगल्या आहेत. त्याबद्दल तुमचे अभिनंदन पण पाणी व कचऱ्याचा प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला आहे, त्यावर लवकर तोडगा काढा, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी (ता. १५) प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली. श्री. पांडेय यांनी प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेतल्या पण काय करणार हे न सांगता दुसऱ्या मिटींगसाठी ते निघून गेले. त्यामुळे माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. एका नाक्यावर पॉझिटीव्ह निघालेला एक जण दुसऱ्या दिवसी शहरात आल्यावर निगेटीव्ह निघाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील इतर प्रश्‍नांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या प्रशासकांना महापालिकेत जाऊन भेटणे शक्य नसल्यामुळे भाजपचे माजी गटनेते प्रमोद राठोड ऑनलाइन पद्धतीने आपल्या समस्या मांडण्याची संधी भाजपच्या नगरसेवकांना उपलब्ध करून दिली. त्यात श्री. राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान घडमोडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, बालाजी मुंडे, प्रदीप बुरांडे, रामेश्‍वर भादवे, ॲड. माधुरी अदवंत, सुनील नाडे, गोविंद केंद्रे, राहुल रोजतकर आदी सहभागी झाले होते.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी व क्वारंटाईन सेंटर तसेच कोविड केअर सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माजी नगरसेकांनी प्रशासकांचे कौतुक केले. मात्र नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही, सिडको भागात कचऱ्याच्या गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकणी पावसाचे पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता आहे, यासह वॉर्डातील समस्या प्रत्येकांनी मांडल्या. होम क्वारंटाईन संदर्भात प्रशासनाने विचार केला पाहिजे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. पॉझिटीव्ह अहवालाबाबत नागरिकांमधील गैरसमज दूर करा, रुग्णांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणी घडमोडे यांनी केली. पाण्याचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी सोडविण्याची प्रशासनला संधी असल्याचे राठोड म्हणाले. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

अॅप डाऊनलोड करा, बेडची माहिती मिळेल 
माधुरी अदवंत यांनी नागरिकांनी उपलब्ध बेडची माहिती मिळावी, अशी मागणी केली. त्यावर श्री. पांडेय यांनी `माझे आरोग्य माझ्या हाती’ अॅप डाऊनलोड करा, त्यात दिवसातून तीनवेळा बेड संदर्भातील माहिती अपडेट केली जाते, असे स्पष्ट केले. 

फक्त एक तक्रार 
नाक्यावर पॉझिटीव्ह आलेला अहवाल शहरात आल्यावर स्वॅब घेतला असता निगेटीव्ह आला. हे कसे का? असा प्रश्‍न राजू शिंदे यांनी प्रशासकांना केला. त्यावर आत्तापर्यंत स्‍वॅब संदर्भात एकच तक्रार आल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT