covid 19 vaccination
covid 19 vaccination covid 19 vaccination
छत्रपती संभाजीनगर

आज औरंगाबादमध्ये ४० केंद्रांवर लसीकरण, लसींचा साठा शिल्लक

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (covid 19 vaccination) मोहीम जोरात सुरू झाली आहे. मात्र, लस उपलब्धतेची अडचण येत असल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. महापालिकेकडे सध्या ३ हजार ९८० लसीचा साठा शिल्लक आहे. सोमवारी (ता. २४ ) महापालिका क्षेत्रात ४० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे (covishield and covaxin). दरम्यान, सोमवारी पुन्हा ९ हजार लस येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (ता. २२) ६६ केंद्रांवर २ हजार १२६ नागरिकांना लस देण्यात आली. रविवारी (ता. २३) लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीच्या साठ्यानुसार लसीकरण केंद्रांचे नियोजन केले जात आहे. सध्या ३ हजार ९८० लस शिल्लक आहे. यामध्ये कोवॅक्सिनची ३०० तर कोव्हिशिल्डची ३ हजार ६८० इतकी लस आहे (covishield and covaxin). यामुळे सोमवारी ४० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाने महापालिकेसाठी ९ हजार लस उपलब्ध करून दिली आहे. ही लस सोमवारी (आज) मिळणार असल्यामुळे ती कधी शहरात येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे सोमवारी ४० केंद्रांवरच लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.

लसीकरण केंद्र-

कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्र-

- भीमनगर आरोग्य केंद्र
- आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र
- गरमपाणी आरोग्य केंद्र
- हर्षनगर आरोग्य केंद्र
- जिन्सी रेंगटीपुरा आरोग्य केंद्र
- औरंगपुरा आरोग्य केंद्र
- बायजीपुरा आरोग्य केंद्र
- गांधीनगर आरोग्य केंद्र
- नेहरूनगर आरोग्य केंद्र
- हर्सूल महापालिका केंद्रीय शाळा
- आयएमए हॉल
- जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र
- गुरुकुल शाळा
- पीरबाजार उस्मानपुरा आरोग्य केंद्र
- चिकलठाणा आरोग्य केंद्र
- नारेगाव आरोग्य केंद्र
- जुनाबाजार आरोग्य केंद्र
- नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र
- सिल्कमिल कॉलनी आरोग्य केंद्र
- बन्सीलालनगर आरोग्य केंद्र
- सिडको एन- ८ आरोग्य केंद्र
- सिडको एन- ११ आरोग्य केंद्र
- विजयनगर आरोग्य केंद्र
- सातारा आरोग्य केंद्र
- न्यू इंग्लिश स्कूल अयप्पा मंदिर जवळ
- शहाबाजार आरोग्य केंद्र
- मसनतपूर आरोग्य केंद्र
- चेतनानगर आरोग्य केंद्र
- गणेश कॉलनी आरोग्य केंद्र
- वंदे मातरम शाळा पुंडलिकनगर
- जीवन विकास प्रतिष्ठान जयभवानी नगर
- सादात नगर आरोग्य केंद्र
- कैसर कॉलनी आरोग्य केंद्र
- मुकूंदवाडी आरोग्य केंद्र
- छावणी परिषद आरोग्य केंद्र
- शिवाजीनगर आरोग्य केंद्र
- भगवान महापालिका शाळा, अजबनगर


कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र

- राजनगर आरोग्य केंद्र
- क्रांतीचौक आरोग्य केंद्र
- एमआयटी हॉस्पिटल एन- ४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT