crime family dispute over five lakh two beaten damage of company machinery
crime family dispute over five lakh two beaten damage of company machinery esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : कंपनीत घुसून तोडफोड, दोघांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : आपापसात नातेवाईक असलेल्या कंपनी मालकाच्या मध्यस्थीने दिलेले ५ लाख रुपये वसूल करण्यासाठी कंपनीत घुसून तोडफोड करत दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता.१३) रात्री साडेदहाच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. या प्रकारामुळे वाळूज परिसरातील उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर सी- २४६ मधील रॅपिड टुलींग शॉपचा मालक सचिन महादेव जायभाये (वय- ३२ वर्ष रा.साई रेसीडेंसी, वडगाव (कोल्हाटी) - बजाजनगर) याच्या मध्यस्थीने डॉ. भास्कर जायभाये यांनी सचिन जायभाये याचा मावसभाऊ ओमकार डोळे यांस दोन वर्षापूर्वी ५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर डोळे याने जायभाय याला चेक (धनादेश) दिला आहे.

गुरुवारी (ता.१३) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सचिन हा कंपनीत असताना डॉ. भास्कर जायभाये याचा मुलगा संशयित आरोपी आर्यन भास्कर जायभाये, सुभाष बडे, बाबुराव बडे व त्यांच्या सोबत असलेला एक अनोळखी असे ४ जण आले. त्यातील आर्यन जायभाये हा म्हणाला की, ओमकार डोळे याला तुझ्या मध्यस्थीने दिलेले ५ लाख रुपये मला दे, तेव्हा सचिनने ओमकार डोळे याने दिलेला चेक (धनादेश) बँके मध्ये टाकण्यास सांगितले.

तेव्हा तुझ्याकडे बघून ओमकार याला पैसे दिलेले आहे, तु मला पैसे दे, असे म्हणून आर्यन जायभायेने शिवीगाळ करत जायभाय व त्याच्यासोबतच्या लोकांनी जबर मारहाण केली. तसेच सचिन जायभाये यांचे प्रिंटर, कुलर, हाईट गेज याची तोडफोड करून नुकसान करून तेथून पळून गेले. यात सचिनला गंभीर दुखापत झाली.

तसेच सचिनच्या कंपनीत काम करणारा संदिप बोराडे यास देखील त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सचिन महादेव जायभाये याच्या फिर्यादीवरून आरोपी आर्यन भास्कर जायभाये, सुभाष बडे, बाबुराव बडे व त्यांचे अन्य अनोळखी साथीदारांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT