crime news
crime news crime news
छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठात छऱ्याचे पिस्टल घेऊन फोटोसेशन करणारे चौघे ताब्यात

सुषेन जाधव

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हातात खेळण्यातले छऱ्याचे पिस्टल हातात घेऊन सिनेस्टाईल फोटोसेशन करणाऱ्या चौघांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पोलिसांनी चार जणांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. तर एकजण पळून गेला असावा, असा अंदाज बेगमपूरा ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी व्यक्त केला.

प्राप्त माहितनुसार विद्यापीठात फोटोसेशन करण्यासाठी पाच ते सहा तरुण सायंकाळी गेले होते. विद्यापीठात वाय कॉर्नरजवळील बॉटनीकल गार्डनजवळ हे तरुण सिनेस्टाईल पद्धतीने फोटोसेशन करत होते. विद्यापीठातील वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती, मात्र सायंकाळी फिरायला आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांना कळविले. नागरिकांनीही पोलिसांना संपर्क केला. या प्रकाराची माहिती मिळताच बेगमपूरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी पथकासह विद्यापीठात धाव घेतली. दरम्यान फोटोसेशन करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून खेळण्यातले पिस्टल, तसेच तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

त्रास नेहमीचाच-
विद्यापीठात विविध ठिकाणी फोटोसेशन करणाऱ्यासाठी येणाऱ्यांचा नेहमीच विद्यार्थिंना, नागरिकांना त्रास होतो. मात्र यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. दरदिवशी होणारा टवाळखोरांचा त्रास विद्यापीठात वावरणाऱ्यांना नेहमीचाच झाला आहे. भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत जाणे, मुलींचा घोळका बघून फोटोशुट करणे, शिट्ट्या वाजविणे असे प्रकार सातत्‍याने घडतात, मात्र विद्यापीठ प्रशासनाची सुरक्षाही या प्रकाराला कंटाळली आहे. पोलिसांचे राऊंडही आता पहिल्यासारखे शिस्तीचे होत नाहीत अशी भावना एका नागरिकाने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

फोटोसेशन करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हा भारतीय हत्यार कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला नसून विनामास्क शूट केल्याप्रकरणी १८८ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
- सचिन सानप, पोलिस निरीक्षक, बेगमपूरा ठाणे
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT