देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस e sakal
छत्रपती संभाजीनगर

व्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घेत संबंधितांवर कारवाई व्हावी : देवेंद्र फडणवीस

प्रकाश बनकर

औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आलेले व्हेंटिलेटरपैकी (Ventilator) ९० टक्के व्हेंटिलेटर सुरू आहेत. केवळ पाच ते दहा टक्के व्हेंटिलेटरमध्ये प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी व्हेंटिलेटर पाठवल्यानंतर ते तीन ते चार महिने पडून होते. असे असले तरी काही मशीन बरोबर नसतील, तर ते बदलून घेतले पाहिजेत व संबंधितांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी सोमवारी (ता.१७) विभागीय आयुक्तालयात माध्यमांशी बोलताना दिली. श्री.फडणवीस म्हणाले की, देशात केंद्र सरकारतर्फे लाखो व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले आहे. यात राज्याला पाच हजार व्हेंटिलेटर केंद्राने दिले आहेत. (Devendra Fadanvis Said, State Government Replace Ventilators)

यातील ९० टक्के मशीन हे देश राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील भागात देण्यात आलेले आहेत. हे मशीन सुरू आहेत. मात्र काहींमध्ये प्रॉब्लेम आले. यात प्रामुख्याने ज्योती कंपनीच्या मशीनमध्येच अडचणी आल्या. हे मशीन चार-चार महिने धूळ खात पडून होते. याची नीट स्टोरेज केले गेले नाही. ते पडून राहिल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात आमचे खासदार डॉ. भागवत कराड (MP Bhagwat Karad) यांनी केंद्र सरकारकडे हा विषय पोहोचविला आहे. अशाप्रकारे कोणी चुकीचे करत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे. मात्र यासंदर्भात राजकारण करू नयेत, असे श्री. फडणवीस यांनी आवाहन केले. जे व्हेंटीलेटर खराब आहेत, ते बदलून घेतले पाहिजे. पण सर्व व्हेंटिलेटर चुकीचे आहेत. त्यात काहीतरी गडबड आहेत, असे आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT