Sangita Sonawane
Sangita Sonawane sakal
छत्रपती संभाजीनगर

jalna : दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून पत्नीचा खून, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन- गहू वाळविण्यासाठी सांगितलेली पट्टी का घेतली नाही, या कारणाहून दारूच्या नशेत पतीने डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथे बुधवारी (ता.एक) रात्री घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अर्जुन चांगु सोनवणे (वय ५५) असे या पतीचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयत पत्नीचे नाव संगीताबाई आहे.

तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथील अर्जुन सोनवणे हे तालुक्यातील वरुड शिवारात राहत होते. अर्जुन याला दारूचे व्यसन जडल्याने घरात नेहमी वादविवाद होत होते. बुधवारी संगीताबाई या मुलासह अंगणात गहू वाळवत असताना दारू पिऊन आलेल्या अर्जुनने गहू वाळविण्यासाठी मी सांगितलेली पट्टी का घेतली नाही असे म्हणत पत्नीसोबत वाद घातला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर दारूच्या नशेत तर्र असणाऱ्या अर्जुनने त्याची पत्नी संगीता हिच्या डोक्यात दगड घातला. या घटनेनंतर अर्जुन सोनवणे घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत संगीताबाई सोनवणे यांना सिल्लोड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, घटनेनंतर गुरुवारी (ता.दोन) सकाळी अर्जुन सोनवणे याने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोकरदन ठाण्यात मयत महिलेचा भाऊ संजय गावंडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT