photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : गोरगरीबांसाठी इको नीड्स फाऊंडेशनची धाव

अनिल जमधडे


औरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने लॉकडाऊन असल्याने अनेकांची उपासमार सुरु झाली आहे. त्यामुळेच इको नीड्स फाऊंडेशन तर्फे विविध वसाहतीत गोरगरीबांना गहू, तांदूळ, तेल, तूर डाळ, मसूर डाळ, हळद आणि मिरची मसाला असे साहित्य देण्यात आले.

इको नीड्स फाऊंडेशन ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी काम करीत आहे. कोरोना विषाणू ही निसर्गाने मानवासाठी दिलेली धोक्याची घण्टा आहे. विकासाच्या नावखाली मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचे काम जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक स्तरांवर विविध देशांनी विविध परिषद आयोजित केल्या परंतु जागतिक प्रदूषणाला नियंत्रणासाठी एकमत होऊ शकले नाही. या उलट विषाणुचा हत्यार म्हणून उपयोग कारण्याच्या या प्रयोगातुन कोरोना विषणुचा प्रदुर्भाव जग भरातील अनेक देशाला झाला. यात गोरगरीब मोठ्या प्रमाणात त्रस्त होताना दिसत आहे. यातुन उपासमारीची मोठी समस्या उभी राहिली आहे. 

मदतीचा हात

म्हणुनच मदतीचा हात म्हणुन येथील कर्मचारी अधिकारी व व्यवसायिक यांनी इको नीड्स फाऊंडेशनशी संलग्न होवून कोरोना आपत्तीमध्ये समाजातील गरजू लोकांसाठी मानवतेचा हात पुढे केला आहे. कोरोना आपत्तीत रोजगार बंद असल्याने हातावर पोट असलेले लोक अपंग निराधार इत्यादी समाज घटकांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे इको नीड्स फाऊंडेशनने समाजातील अशा गरजू लोकांचा शोध घेवून त्यांना गहू, तांदूळ, तेल, तूर, डाळ, मसूर डाळ, हळद, मिरची मसाला अशी खाद्य सामुग्रीच्या किट थेट घरापर्यंत पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला. 

विविध वसाहतींची निवड

त्याचा एक भाग म्हणून शहरातील इंदिरानगर, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर तसेच काही विद्यार्थी यांना खाद्य सामुग्री  मदत म्हणून देण्यात आलेली आहे. या उपक्रमात अनिलकुमार बस्ते यांनी खाद्य तेलाची पाकिटे उपलब्ध करून दिली. तसेच इतर खाद्य सामुग्री खरेदीसाठी डॉ. प्रियानंद आगळे, डॉ सत्यपालसिंग मीना, विक्रांत कांबळे, डॉ मनीषा अंभोरे, भास्कर म्हस्के, प्रा अर्चना मांडे, शिवाजी वाघमारे, संघपाल रोडगे, ॲड विनय सरवदे, नंदा गायकवाड, योगेश्वर इंदासराव, प्रशांत कानेकर, मुनेश्वर ओहळकर, प्रशांत दंदे, छाया जाधव, विजेंद्र शेवाळे, अंकुश म्हस्के, प्रशांत सुरडकर, ॲड. अत्तदीप आगळे, रमेश नागमवाड, गणेश नन्दे, प्रा. पल्लवी आम्ले, मिलिंद मघाडे, गौतम राजभोज यांनी आर्थिक मदत उभी करून २५० लोकांच्या दहा दिवसांच्या खाद्य सामुग्रीची पूर्तता केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT