auto riksha  sakal
छत्रपती संभाजीनगर

Latur News : रस्ते चार, ऑटोरिक्षा आठ हजार

लातूर शहरात फक्त ५५ थांबे; गेल्या दहा वर्षांत नाही वाढ

सकाळ वृत्तसेवा

लातूर : शहरात बेशिस्त वाहतुकीला ऑटोरिक्षा चालकही जबाबदार आहेत, अशी नेहमीच ओरड होते. परंतु सद्यःस्थितीत शहरातील मुख्य चार रस्त्यावर आठ हजार ऑटोरिक्षा धावत आहेत. या रिक्षांसाठी शहरात केवळ ५५ थांबे आहेत. गेल्या दहा वर्षात लोकसंख्या वाढली, ऑटोरिक्षांची संख्या वाढली पण थांबे मात्र एकही वाढले नाहीत. याचा परिणामी मोठ्या संख्येने असलेल्या ऑटोरिक्षा शहरात मिळेल त्या जागेवर उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा होताना दिसत आहेत.

शहरात औसा रस्ता, नांदेड रस्ता, बार्शी रस्ता व अंबाजोगाई रस्ता हे चारच प्रमुख रस्ते आहेत. या चार रस्त्यावरच वाहनांची सातत्याने वर्दळ असते. या रस्त्यावरच दररोज कोठे ना कोठे वाहतुकीची कोंडी होते. यात अनेक ठिकाणी ऑटोरिक्षामुळे ही वाहतुकीची कोंडी होते. बेशिस्त असलेल्या ऑटोरिक्षामुळे इतर वाहनधारकही त्रस्त होतात. पण ऑटोरिक्षांच्या अडचणीच वेगळ्या आहेत. शहरात गेल्या काही वर्षापासून ऑटोरिक्षांची संख्या वाढली आहे.

सध्या शहरात आठ हजार ऑटोरिक्षा आहेत. एखादा प्रवासी आला तर पाच दहा ऑटोरिक्षा त्याच्याकडे जातात अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे ऑटोरिक्षा चालक पाठीमागून वाहन येत आहे की नाही हे पाहताच त्या प्रवाशाकडे आपले वाहन वळवतात असे काहीसे चित्र शहरात आहे.

शहरात चारच प्रमुख रस्ते आहेत. त्यावरच हे आठ हजार ऑटोरिक्षा फिरतात. थांबे वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. परवाना खुला झाल्याने ऑटोरिक्षांची संख्या वाढली आहे. हा व्यवसाय करताना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथे परवाना देणे बंद करण्याची गरज आहे. अन्यथा कितीही थांबे वाढवले तरी ऑटोरिक्षा वाढत जातील, वाहतुकीची कोंडी होत राहील.

— त्र्यंबक स्वामी,

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेना, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT