छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत मुसळधार पाऊस, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित

अनिल जमधडे

रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरुच होता. कधी हलक्या सरी तर लागलीच जोरदार पाऊस कोसळत होता.

औरंगाबाद : शहर (Aurangabad) व परिसरात बुधवारी (ता. दोन) रात्री विजेच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस (Rain) झाला. सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरुच होता. शहरात गेल्या दोन- तीन दिवसापासून पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी (ता. २) दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास तासभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरुच होता. कधी हलक्या सरी तर लागलीच जोरदार पाऊस कोसळत होता. दरम्यान, बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात २५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Heavy Rain Hit Aurangabad In Late Night)

औरंगाबाद शहरात रात्री उशीरा जोरदार पाऊस झाला. (छायाचित्र : सचिन माने)

यंदा जोरदार पाऊस राहिल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्याच अंदाजाप्रमाणे पावसाने सुरवात केल्याने शेतकरी सुखावले असून, खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी व मंगळवारी सायंकाळी काही भागात जोरदार तर काही भागात भीजपाऊस झाला. शहर परिसरातील भावसिंगपुरा व विहामांडवा (ता. पैठण) येथे अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT