jalna
jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : लोकसभेत महायुती ४५ प्लस ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा

जालना : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुती ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. राजूर रोडवरील शहरातील भारती लॉन येथे रविवारी (ता.१४) आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, भास्कर दानवे, बद्रीनाथ पठाडे, सिद्धिविनायक मुळे यांच्यासह महायुतीच्या नेते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल. मध्यमवर्गीय, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, आर्थिक दुर्बल या सर्व घटकांसह राज्यातील संपूर्ण समाज मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशाला जगात विकासाच्या बाबतीत अव्वल स्थानी नेण्यासाठी पाठीशी उभा आहे.

महायुतीच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी इच्छुक आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील, विरोधात कुणीही दिसणार नाही, असे श्री. दानवे यांनी म्हटले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण यांचीही भाषणे झाली.

भाजपची बूथनिहाय बांधणी

महायुतीच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागल्याचे चित्र आहे. शिवाय भाजपकडूनही बूथनिहाय बांधणी सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT