Manasi Sonawane Sakal
छत्रपती संभाजीनगर

स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, मग यश तुमचेच

‘यूपीएससी’त घवघवीत यश मिळविलेल्या मानसी सोनवणेचा ‘करिअर मंत्र’

संदीप लांडगे

औरंगाबाद - मोठे होण्यासाठी मोठे स्वप्न पाहा. ध्येय निश्चित करा. त्यादिशेने सातत्यपूर्ण परिश्रम करा. या दिशेने गेलात तर यश तुमचेच आहे, असा ‘करिअर मंत्र’ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या मानसी सोनवणे हिने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाईला दिला आहे.

चिनार गार्डन पडेगाव येथील रहिवासी असलेले नरेंद्र केशवराव सोनवणे यांची मुलगी मानसी सोनवणे हिने यूपीएससी परीक्षेत ६२६ वी रॅंक मिळवत यश संपादन केले. यूपीएससीचा निकाल सोमवारी (ता.३०) जाहीर करण्यात आला. निवड यादीत नाव झळकताच मानसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘सकाळ’ कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. मानसीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण नाशिक येथे इंग्रजी माध्यमातून घेतले. त्यानंतर औरंगाबादेतील शासकीय कला महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कला शाखेसाठी इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र या विषयांची निवड केली होती. बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा दिल्यानंतर तिचा ‘एमबीबीएस’ला नंबर लागला होता. मात्र, यूपीएससी करण्याचे ध्येय होते. घरच्यांचाही पाठिंबा होता. त्यामुळे एमबीबीएस न करता तिने यूपीएससीची तयारी केली.

तिसऱ्या प्रयत्नात यश

पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यावेळी थोडीशी निराशा आली होती. मात्र, जिद्द कायम ठेवली, सातत्याने अभ्यास केला, निश्चितपणे यशस्वी व्हायचे हा उद्देश ठेवून प्रयत्न केला. त्यासाठी एनसीईआरटीसारख्या मूलभूत पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रे, युट्यूबवरील निवडक व्हिडिओसह दररोज सात तास अभ्यास केला. अवांतर वाचन केले. कोचिंगचेही मार्गदर्शन घेतल्याने प्रयत्नांना निश्चित दिशा मिळाली. यात तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद आहे. मला शिक्षण क्षेत्रात तसेच महिलांच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. माझ्या यशाचे श्रेय आई - वडिलांना आहे, असेही मानसीने सांगितले.

आईवडिलांचा पाठिंबा

मानसीचे वडील नरेंद्र सोनवणे व आई अर्चना हे दोघेही शासकीय अधिकारी आहेत. मानसीच्या वडिलांनी यूपीएससीची तयारी केली होती. मात्र, त्यांना यश मिळविता आले नाही. आपल्या मुलीने यात यश मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मानसीला सतत पाठिंबा दिला, योग्यवेळी मार्गदर्शनही केले. निराशेच्या काळात ते खंबीरपणे तिच्या पाठीशी राहिले.

युवकांना सल्ला

  • यश मिळविण्यासाठी सहनशीलता खूप आवश्यक आहे.

  • एक दोन महिने नव्हे तर अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे.

  • यूपीएससीनंतर आपल्याला नेमकं करायचं काय याचा गोल ठरवा.

  • असे केल्यास परीक्षेचा दबाव तुमच्यावर राहणार नाही.

  • मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवावा.

  • यूपीएससीसाठी लिखाणाचा सराव आवश्यक असतो.

  • पेपर सोडविताना उत्तराची क्वालिटी महत्त्वाची असते.

  • यूपीएससीची तयारी करताना आईवडिलांसह, चांगल्या मित्रमैत्रिणींचे

  • मार्गदर्शन व नैतिक पाठिंबा असणे गरजेचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT