balasaheb thorat
balasaheb thorat balasaheb thorat
छत्रपती संभाजीनगर

'अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना निश्‍चितपणे मदत केली जाईल'

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल, असा विश्‍वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. महसूलमंत्री शुक्रवारी (ता.३०) औरंगाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी विभागीय आयुक्त यांच्या दालनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता. ३०) आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, अपर आयुक्त आबासाहेब बेलदार, अविनाश पाठक, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मिनियार, पांडुरंग कुलकर्णी, वामन कदम, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.

महसूलमंत्री थोरात यांनी मराठवाडा विभागातील कोरोनाची स्थिती, पाऊस, धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पेरणी, अतिवृष्टीने झालेले नुकसान, गौणखनिज याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. विभागातील पावसाच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल. त्यांनी सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार यांचादेखील आढावा घेतला.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत श्री. थोरात यांनी कौतुक करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्याबाबत सूचित केले. कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वाळू लिलावाच्या संबंधित अडचणी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रस्ताव द्यावेत, असे त्यांनी सूचित केले. प्रारंभी श्री. केंद्रेकर यांनी विभागात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडची उपलब्धता, पाऊस, पेरणी, ई-पीक पाहणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार, वाळू लिलावाबाबत सविस्तर माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT